Lokmat Sakhi >Food > दूध न फाटण्यापासून, जाड मलईपर्यंत; दूध गरम करण्याआधी अन् नंतर 'या' ट्रिक्स नक्की लक्षात ठेवा

दूध न फाटण्यापासून, जाड मलईपर्यंत; दूध गरम करण्याआधी अन् नंतर 'या' ट्रिक्स नक्की लक्षात ठेवा

Milk tricks : समजा रात्री तुम्ही या पद्धतीनं दूध गरम करून ठेवलं तर सकाळी आपण दुधामधून मलई बाहेर काढून  एका स्वच्छ भांड्यात साठवून ठेवू शकता. घरगुती तूप बनवण्यापासून ते मिठाई बनवण्यापर्यंत याचा उपयोग होऊ शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 07:22 PM2021-06-04T19:22:23+5:302021-06-04T19:43:02+5:30

Milk tricks : समजा रात्री तुम्ही या पद्धतीनं दूध गरम करून ठेवलं तर सकाळी आपण दुधामधून मलई बाहेर काढून  एका स्वच्छ भांड्यात साठवून ठेवू शकता. घरगुती तूप बनवण्यापासून ते मिठाई बनवण्यापर्यंत याचा उपयोग होऊ शकतो.

Milk tricks : how to make fresh cream or malai at home | दूध न फाटण्यापासून, जाड मलईपर्यंत; दूध गरम करण्याआधी अन् नंतर 'या' ट्रिक्स नक्की लक्षात ठेवा

दूध न फाटण्यापासून, जाड मलईपर्यंत; दूध गरम करण्याआधी अन् नंतर 'या' ट्रिक्स नक्की लक्षात ठेवा

Highlightsउन्हाळ्यात दूध फाटण्याची समस्या अगदी सामान्य आहे. दुध फाटण्यापासून रोखण्यासाठी, उकळण्यापूर्वी चिमूटभर बेकिंग सोडा घाला. दूध उकळवण्यासाठी भांडी स्वच्छ असावी. थोडासा साबण जर भांड्याला असेल तरीही काही मिनिटात दूध खराब होऊ शकतं.  

दूध तापवणं  आणि खराब होऊ नये म्हणून काळजी घेणं  हे घरोघरच्या बायकांचं रोजचं काम. ऐनवेळी दुध नासलं की सगळंच फिस्कटतं. अनेक घरांमध्ये दुधाची जाड मलई ही तूप काढण्यासाठी तसेच मिठाई बनवण्यासाठी वापरली जाते. म्हणूनच प्रत्येकाला जाड मलई दुधातून बाहेर पडायला हवी असं वाटतं. दुधावर जाड मलई येण्यासाठी लोक बर्‍याच युक्त्या अवलंबतात, परंतु बर्‍याच वेळा जाड मलई दुधावर येत नाही.

यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. दरम्यान उन्हाळ्यात लोक तक्रार करतात की बाहेर ठेवलेले दूध पटकन खराब होते किंवा जाड मलई दुधावर येत नाही. आपल्याला दुधाशी संबंधित अशाच समस्या असल्यास या सोप्या टिप्स नक्की कामात येतील. 

जाड सायीसाठी असं तापवा दूध

दूध उकळी आल्यावर मंद आचेवर ८ ते १० मिनिटे उकळवून घ्या. आता गॅस बंद करा. आता ते थंड होईपर्यंत दुधावर जाळीचे झाकण ठेवा. प्लेट ठेवल्याने मलई जाड होत नाही. बहुतेक लोकांना हे माहित नसतं. नंतर रूम टेंमरेचरवर  दूध थंड होऊ द्या. आता मलई दिसू लागेल.

दुध जास्त ढवळत न येता फ्रिजमध्ये ठेवा. आता दुधाचा वापर करू नका. दूध कमीतकमी 3 तास फ्रीजमध्ये ठेवा. मग मलई जाड होईल आणि सेट होईल. समजा रात्री तुम्ही या पद्धतीनं दूध गरम करून ठेवलं तर सकाळी आपण दुधामधून मलई बाहेर काढून  एका स्वच्छ भांड्यात साठवून ठेवू शकता. घरगुती तूप बनवण्यापासून ते मिठाई बनवण्यापर्यंत याचा उपयोग होऊ शकतो.

दूध फाटू नये म्हणून काय करायचं?

उन्हाळ्यात दूध फाटण्याची समस्या अगदी सामान्य आहे. दुध फाटण्यापासून रोखण्यासाठी, उकळण्यापूर्वी चिमूटभर बेकिंग सोडा घाला. त्यानंतर दूध उकळवा. असे केल्याने दूध फाटण्याची शक्यता कमी होते. परंतु हे करताना लक्षात घ्या की आपल्याला हे दूध एका दिवसातच वापरावे लागेल. अन्यथा खराब होऊ शकतं. जास्त दूध असेल तर हा प्रयोग शक्यतो टाळावा.

पाणी घाला

लक्षात ठेवा की दूध उकळवण्यासाठी भांडी स्वच्छ असावी. थोडासा साबण जर भांड्याला असेल तरीही काही मिनिटात दूध खराब होऊ शकतं.  भांड्यात दूध ओतण्यापूर्वी त्यात थोडेसे पाणी घाला. यामुळे दूध तळाशी चिकटत नाही आणि क्रीमदेखील वर जमा होते.

रूम टेंमरेचरवर ठेवा

खूप गरम किंवा खूप थंड असलेले दूध कधीच फाटत नाही. जेव्हा दूध रूम टेंमरेचरवर असते तेव्हा दुध फुटण्याची सर्वाधिक शक्यता असते. म्हणूनच सामान्य तापमानात येताच ते फ्रीजमध्ये ठेवायला हवं. याशिवाय दूधाच्या  सेवनानं शरीर नेहमी चांगले राहते. याशिवाय अनेक आजारांचा धोका कमी होतो. रोज एक ग्लास दूध प्यायल्यानं आपला आहार पूर्ण होतो.  दूधात प्रोटीन्स,  गुड फॅट्स, कॅलरीज, कॅल्शियम, व्हिटामीन डी, बी २, व्हिटामीन बी १२, पोटॅशिमय, फॉस्फोरस आणि सेलेनियम सारखे पोषण तत्व असतात.  

नवीन संशोधनात असे समोर आले आहे की दररोज एक ग्लास दुधाचे सेवन केल्यास गंभीर हृदयविकारांचा धोका टाळता येतो. आयुर्वेदात दुधाला संपूर्ण आहार म्हणतात. संशोधनानुसार दररोज दुधाचे सेवन केल्यास कोलेस्टेरॉलची पातळीही नियंत्रणात राहते. या संशोधनात दोन दशलक्ष अमेरिकन आणि ब्रिटिश नागरिकांचा सहभाग होता, ज्याचा निकाल आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे. 

हाडांच्या मजबूतीसाठी दूध फार महत्त्वाचं आहे. दुधात कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असतात. जे हाडांना मजबूती देण्याचं काम करतात. जर तुम्ही रात्री दूध प्यायलात तर याचा फायदा अधिक होतो.जर तुम्ही रात्री गरम दूध सेवन केलं जर तुमची पोटाची समस्या दूर होण्यास मदत होते. दोन्ही प्रकारचे फायबर दुधात असल्याने पोटाची समस्या दूर होते. दुधात भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात. याने मांसपेशींचा विकास होण्यास मोठा फायदा होतो. प्रोटीन आणि फायबर हे दोन्ही महत्त्वपूर्ण पोषक तत्वे आहेत. जे आपल्या शरीराला वजन कमी करण्यास मदत करतात.

रात्री दूध प्यायल्याने तुम्हाला कॅलरी बर्न करण्यास फार फायदा होतो. कारण दूध प्यायल्याने तुम्हाला चांगली झोप लागते आणि चांगल्या झोपेने कॅलरी बर्न होतात. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर ते सेवन करताना त्यात साखर, चॉकलेट किंवा कोणताही फ्लेवर टाकू नये.
 

Web Title: Milk tricks : how to make fresh cream or malai at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.