Join us  

स्मृती इराणीही फिदा झाल्या वाराणसीच्या 'लस्सी'वर; या लस्सीत 'असे' खास काय आहे, वाचा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2022 5:32 PM

Food and recipe: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी नुकताच वाराणसीचा (Varanasi) दौरा केला असून या दाैऱ्यात त्यांना आवडलेल्या तिथल्या स्पेशल लस्सीची (pahelwan ji ki lassi) चर्चा सध्या सोशल मिडियावर चांगलीच रंगली आहे. 

ठळक मुद्देघट्ट दह्यापासून केलेली लस्सी आणि त्यावर तेवढीच घट्ट रबडी .. असं भन्नाट कॉम्बिनेशन असणारी 'पहलवान जी की लस्सी' खवय्यांची रसनातृप्ती करणारी आहे.. 

मंत्री मंडळातील काही मोजके सदस्य सोशल मिडियावर ॲक्टीव्ह असतात. यापैकी एक नाव म्हणजे स्मृती इराणी (Smriti Irani ). सोशल मिडियाच्या (social media) माध्यमातून त्या नेहमीच त्यांच्या चाहत्यांच्या, सर्वसामान्य लोकांच्या कनेक्टमध्ये राहण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या घरापासून ते जागतिक स्तरापर्यंतच्या अनेक गोष्टी त्या सोशल मिडियावर शेअर करतात. आता नुकतीच त्यांनी काशीला भेट दिली असून तिथले आणि त्यांच्या या सहलीतले अनेक फोटो त्यांनी इन्स्टाग्रामला शेअर (instagram share) केले आहेत.

 

त्यांनी काशी विश्वेश्वराला अभिषेक केला, तो फोटो आणि ती त्यांची पोस्टही प्रचंड व्हायरल झाली आहे. लाखो लोकांनी त्यांच्या पोस्टला लाईक केले आहे. या पोस्टप्रमाणेच त्यांची एक इन्स्टाग्राम स्टोरीही चांगलीच व्हायरल झाली होती. या त्यांच्या स्टोरीच्या पोस्टने खवय्यांचे लक्ष वेधून घेतले होते. कारण त्यांनी शेअर केलेला फोटो होता वाराणसीच्या प्रसिद्ध लस्सीचा.. 'पहेलवान जी की लस्सी'  असं त्या लस्सीचं नाव (pahelwan ji ki lassi from Varanasi).. एरवी लस्सी म्हणजे थोडी आंबट- गोड चवीची. पण या लस्सीत रबडीचा वापर केला जातो, त्यामुळे तिची चव आणि बनविण्याची पद्धत दोन्हीही खूप वेगळी आहे. 

 

'पहेलवान जी की लस्सी' हा वाराणसीचा अतिशय खास पदार्थ. वाराणसीला गेलात आणि या लस्सीची चव घेऊन पाहिली नाही, तर तुमचा प्रवास सफल झाला नाही, असं तिथं म्हणतात.. बॉलीवूडपासून ते बडे- बडे उद्योजक आणि राजकीय नेत्यांपर्यंत अनेकांनी या लस्सीचा आस्वाद घेतला आहे. अशी ही फेमस लस्सी स्मृती इराणी यांनाही भलतीच आवडली आहे. त्यांनी शेअर केलेला लस्सीचा फोटो पाहूनच ही लस्सी काही खास असणार असं नक्कीच वाटतं.. 

 

खास कुल्लडमध्ये दिली जाणारी ही लस्सी कशी करतात ते या व्हिडिओमध्ये बघा. लस्सीचा छोटा ग्लास ३० रुपयांना, मोठा ४० रुपयांना तर बर्फ न टाकलेली लस्सी ५० रुपयांना मिळते. घट्ट दह्यापासून केलेली लस्सी आणि त्यावर तेवढीच घट्ट रबडी .. असं भन्नाट कॉम्बिनेशन असणारी 'पहलवान जी की लस्सी' खवय्यांची रसनातृप्ती करणारी आहे.. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीसोशल व्हायरलइन्स्टाग्रामस्मृती इराणीवाराणसी