Lokmat Sakhi >Food > गारेगार पुदिना रायता म्हणजे उन्हाळ्यात सुखच सुख! करा ५ मिनिटांत, पोटाला मिळेल थंडावा

गारेगार पुदिना रायता म्हणजे उन्हाळ्यात सुखच सुख! करा ५ मिनिटांत, पोटाला मिळेल थंडावा

Mint Raita is a summer delight! Make it in 5 minutes : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खायलाच हवा असा हा रायता. पुदिना म्हणजे थंडावा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2025 18:55 IST2025-04-17T18:52:16+5:302025-04-17T18:55:03+5:30

Mint Raita is a summer delight! Make it in 5 minutes : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खायलाच हवा असा हा रायता. पुदिना म्हणजे थंडावा.

Mint Raita is a summer delight! Make it in 5 minutes | गारेगार पुदिना रायता म्हणजे उन्हाळ्यात सुखच सुख! करा ५ मिनिटांत, पोटाला मिळेल थंडावा

गारेगार पुदिना रायता म्हणजे उन्हाळ्यात सुखच सुख! करा ५ मिनिटांत, पोटाला मिळेल थंडावा

ही रेसिपी खास उन्हाळ्याच्या दिवसांसाठी असली तरी इतरही दिवशी खाणे शरीरासाठी फायद्याचेच आहे. ( Mint Raita is a summer delight! Make it in 5 minutes)थंडगार दही वापरून हा पदार्थ करा. उन्हाळ्यामध्ये फारच फायद्याचा ठरेल. शरीराला आतून थंड ठेवण्यासाठी आहारात हा रायता असायलाच हवा. शिवाय चवही मस्त लागते.

साहित्य
पुदिना, दही, कोथिंबीर, मीठ, काकडी, लाल तिखट, काळे मीठ, जिरे, जिरे पूड मोहरी, हिरवी मिरची, कडीपत्ता, तेल, आलं, बटाटा, डाळिंब, हिंग

कृती
१. डाळिंबाचे दाणे काढून घ्या. डाळिंब वापरले नाही तरी चालते. पण त्याची चव अगदी छान लागते. पुदिना छान धुऊन घ्या. ( Mint Raita is a summer delight! Make it in 5 minutes)चांगला निवडून घ्या. मग सुरीने बारीक चिरुन घ्या. कोथिंबीरही छान बारीक चिरुन घ्या. काकडी मस्त किसून घ्या. काकडीचे पाणीसुद्धा रायत्यासाठी वापरा. काकडी किसल्यावर त्याचे उरलेले पाणी फार चविष्ट लागते. 

२. आलं छान किसून घ्या. हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करा. बटाटा उकडून घ्या. उकडलेला बटाटा सोलून घ्या. नंतर त्याचे बारीक तुकडे करून घ्या. बटाटा मस्त मऊ झाला की छान लागेल. तुकडे करताना त्याचा लगदा करु नका. 

३. आता एका खोलगट भांड्यामध्ये किसलेली काकडी घ्या. त्यामध्ये चिरलेला पुदिना टाका. मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर टाका. बटाट्याचे तुकडे टाका. सगळं छान मिक्स करा आणि मग त्यामध्ये जिरे पूड टाका. तसेच लाल तिखट टाका. काळे मीठ टाका. पचनासाठी हे मीठ फार चांगले असते. त्यामध्ये दही टाका. डाळिंबाचे दाणे टाका. सगळं एकजीव करुन घ्या. 

४. एका कढईमध्ये फोडणी करा. त्यासाठी त्यामध्ये चमचाभर तेल घाला. तेल कमीच वापरा म्हणजे मग वजन कमी करण्यासाठी या रायत्याचा उपयोग होईल. त्या तेलामध्ये मोहरी टाका. ती जरा तडतडली की त्यामध्ये जिरे टाका. जिरं छान फुलल्यावर त्यामध्ये कडीपत्ता टाका.चमचाभर हिंग टाका. हिरव्या मिरचीचे तुकडे टाका. फोडणी नीट ढवळून घ्या. मग केलेल्या रायत्यावर ती फोडणी ओता. रायता आणि फोडणी मस्त एकजीव करून घ्या. आहारात हा रायता असायला हवा. पोटासाठी फायदेशीर आहे तसेच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडावा मिळेल.     

Web Title: Mint Raita is a summer delight! Make it in 5 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.