Lokmat Sakhi >Food > जेवताना तोंडी लावण्यासाठी करा मिरचीची खमंग भजी; झटपट सोपी -चमचमीत रेसेपी

जेवताना तोंडी लावण्यासाठी करा मिरचीची खमंग भजी; झटपट सोपी -चमचमीत रेसेपी

Mirchi Pakoda : सकाळच्या नाश्त्याला किंवा जेवताना तोंडी लावायला तुम्ही या भजी खाऊ शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 03:16 PM2022-08-11T15:16:02+5:302022-08-11T17:04:04+5:30

Mirchi Pakoda : सकाळच्या नाश्त्याला किंवा जेवताना तोंडी लावायला तुम्ही या भजी खाऊ शकता.

Mirchi Pakoda : How to make Chilli Pakora Mirchi bhajiya recipe | जेवताना तोंडी लावण्यासाठी करा मिरचीची खमंग भजी; झटपट सोपी -चमचमीत रेसेपी

जेवताना तोंडी लावण्यासाठी करा मिरचीची खमंग भजी; झटपट सोपी -चमचमीत रेसेपी

पावसाळ्यात सगळ्यांनाच काहीतरी चटपटीत खायला आवडते. विशेषतः गरम भजी.  तुम्हालाही चटपटीत  काही खाण्याची इच्छा होत असेल तर  तुम्ही हिरव्या मिरचीचे (Chilli Pakora) पकोडे बनवू शकता.  सकाळच्या नाश्त्याला किंवा जेवताना तोंडी लावायला तुम्ही या भजी खाऊ शकता. मोठ्या हिरव्या मिरच्यांपासून बनवलेले हे पकोडे खूप चवदार असतात कारण या मिरच्यांमध्ये तिखटपणा कमी असतो. (How to make Chilli Pakora Mirchi bhajiya recipe)

हिरव्या मिरचीसाठी लागणारं साहित्य

चार ते सहा मोठ्या हिरव्या मिरच्या मधोमध कापून आतल्या बिया काढून टाका. जेणेकरून त्या अजिबात तिखट राहू नये. तळण्यासाठी तेल, पीठ बनवण्यासाठी बेसन, पाणी, आलं पेस्ट, लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, उकडलेले बटाटे, जिरे, गरम मसाला, चाट मसाला, लाल तिखट, हिरवी मिरची, बारीक चिरून, कांदा बारीक चिरून. 

मिरचीचे पकोडे बनवण्याची कृती

सर्व प्रथम पीठ तयार करा. यासाठी बेसनामध्ये पाणी घालून घट्ट पीठ तयार करा. या द्रावणात चवीनुसार मीठ, तिखट, थोडीशी चाट मसाला पावडर घाला आणि बाजूला ठेवा. आता उकडलेले बटाटे मॅश करा. बारीक चिरलेली हिरवी मिरची, लाल तिखट, बारीक चिरलेला कांदा, लसूण आणि आले पेस्ट घाला. सोबत चवीनुसार मीठ, आमचूर पावडर. गरम मसाला आणि जिरेपूड घाला आणि सर्वकाही मॅश करा.

तोंडात टाकताच विरघळणारे नारळाचे लाडू; फक्त 3 गोष्टी वापरुन 10 मिनिटात करा; ही घ्या रेसिपी

आता  हिरव्या मिरच्या काढा, ज्याच्या सर्व बिया काढून टाकल्या आहेत. त्यात बटाट्याचे मिश्रण चांगले भरा. आता कढई गरम करा. त्यात तेल घालून गरम करा. बटाट्याने भरलेल्या  हिरव्या मिरच्या बेसनच्या जाडसर पिठात बुडवून घ्या आणि ही बुडवलेली मिरची तव्याच्या गरम तेलात घालून सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. हिरव्या चटणीबरोबर ही चटणी सर्व्ह करा. 

Web Title: Mirchi Pakoda : How to make Chilli Pakora Mirchi bhajiya recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.