Join us  

Mirinda golgappa : काय हा विचित्र प्रयोग! भावानं पहिल्यांदाच टेस्ट केली मिरिंडा पाणीपुरी; पाहा त्याची भन्नाट रिऍक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 3:36 PM

Mirinda golgappa : या विचित्र फूड कॉम्बिनेशन्समुळे नेटिझन्स  नाराज झाले आणि अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये नाराजी व्यक्त केली.

आजकाल विचित्र खाद्यपदार्थ बनवतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड ट्रेंड करत आहेत. फंटा मॅगी, फायर मोमो आणि ओरिओ पकोडा, पिझ्झा पुरणपोळी यांसारख्या अनेक विचित्र पदार्थांनी नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे. आता जयपूरमधील एका व्यक्तीने मिरिंडा गोलगप्पा बनवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (Man makes mirinda golgappa in viral video from jaipur internet is disgusted)

चटोरे ब्रदर्स नावाच्या पेजने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, पाणीपूरी विक्रेता मिरिंडाची बाटली हलवून नंतर मोठ्या भांड्यात टाकतो. त्यानंतर बटाट्यानं भरलेल्या पुरीत तो हे पेय भरताना दिसतो. व्हिडिओच्या कॅप्शननुसार या ठिकाणी वेगवेगळे फूड कॉम्बिनेशन्स असलेल्या डिशेस उपलब्ध होतात.  ही पाणीपुरी खाल्ल्यानंतर आधी तो तरूण गोंधळतो नंतर ही मिरिंडा  पाणीपुरी चवीला मस्त असल्याचं हातवारे करत सांगतो.

ऑनलाइन पोस्ट केल्यानंतर,  या क्लिपला 3 दशलक्षाहून अधिक व्हिव्हज मिळाले. या विचित्र फूड कॉम्बिनेशन्समुळे नेटिझन्स  नाराज झाले आणि अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये नाराजी व्यक्त केली. “मूड ही खराब कर दिया,” एक वापरकर्ता म्हणाला. दुसर्‍या वापरकर्त्याने टिप्पणी दिली, “नॉनसेन्स.”

 पाणीपुरी आईस्क्रीमचा अतरंगी प्रयोग

पाणीपुरी आईस्क्रीमचा आस्वाद घेत असलेल्या एका मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडीओची सुरुवात करताना अंजलीने तिच्या दर्शकांना पाणीपुरी आईस्क्रीमबद्दल कधी ऐकले आहे का असं विचारलं. मिठाईचे पॅकेट हातात धरून अंजली म्हणाली की तिने ते बेंगळुरूमधील डॉक फ्रॉस्टड नावाच्या हॉटेलमधून ऑर्डर केले आहे आणि ती आता ते खाऊन पाहणार आहे. 

अंजलीने फूड पॅकेट काढले आणि त्यात आईस्क्रीमच्या कपाच्या मध्यभागी पुरी व्यवस्थित ठेवली होती. अंजलीनं  हे आईस्क्रीम टेस्ट केलं आणि त्याचा रिव्हीव्हसुद्धा दिला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पुरी थंडगार आईस्क्रीमने वेढलेली असूनही कुरकुरीत राहिली. “आंबट चिंचासारखी आइस्क्रीमची चव आहे,” असं तिने व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.  याशिवाय अंजली म्हणाली की,  “पाणीपुरी तिखट पाणी आणि मसालेदार पदार्थांसाठी ओळखली जाते. त्यामुळे आईस्क्रीमची गोड चव पाणीपूरीमध्ये जागा किती जणांना आवडेल, हा प्रश्न अजूनही मला पडलाय.

टॅग्स :अन्नपाककृतीसोशल व्हायरल