Join us  

एअरफ्रायरमध्ये पदार्थ गरम करताना ३ चुका टाळा, चवही बदलते आणि होते ' हे ' नुकसान...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2024 5:49 PM

3 dangerous mistakes to avoid when cooking in an air fryer : अन्नपदार्थ गरम करण्यासाठी एअर फ्रायरचा वापर करताय?

बदलत्या काळानुसार किचनमधील उपकरणे देखील सतत बदलत असतात. कमी वेळात आणि कमी कष्ट करुन झटपट स्वयंपाक करता यावा यासाठी आपण वेगवेगळ्या उपकरणांचा वापर करतो. एयरफ्रायर हे त्यापैकीच एक नवीन उपकरण आहे. कमी तेलात जास्तीत जास्त पदार्थ तयार करता यावे तसेच अन्नपदार्थ झटपट गरम करण्यासाठी देखील या एयरफ्रायरचा वापर केला जातो. एयरफ्रायरमध्ये, तुम्ही अगदी कमी तेलात कोणताही पदार्थ बनवू शकता. एअर फ्रायरमध्येही अन्न सहजपणे पुन्हा रिहित करता येते. फक्त काही सेकंदात तुम्ही तुमचे अन्नपदार्थ पूर्णपणे गरम करू शकता(Mistakes Everyone Makes With Air Fryers).

घाई गडबडीच्यावेळी एयरफ्रायरचा वापर करुन स्वयंपाक करणे सोपे जाते. परंतु या एयरफ्रायरचा वापर करताना काहीवेळा आपल्याला अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. बरेचदा एयरफ्रायर (3 Common Air Fryer Mistakes—And How to Avoid Them) बद्दल काहीजण एक कॉमन तक्रार करतात ती म्हणजे, एयरफ्रायरमध्ये अन्नपदार्थ व्यवस्थित गरम होत नाही. याचबरोबर एयरफ्रायरमध्ये अन्नपदार्थ ओले होतात अशी देखील तक्रार केली जाते. अशावेळी नेमके काय करावे हे सुचत नाही. यासाठी एयरफ्रायरचा वापर करताना काही चुका आपण करतो. या लहान - सहान चुका टाळून एयरफ्रायरमध्ये अन्नपदार्थ गरम करण्याची सोपी पद्धत कोणती ते पाहूयात(3 Mistakes to Avoid While Cooking With an Air Fryer).

एयरफ्रायर वापरताना या ३ चुका करू नका...  

चूक १ :- एयरफ्रायरच्या बास्केटमध्ये एकदम एकाचवेळी जास्त अन्नपदार्थ भरुन ठेवणे. 

साधारणपणे, आपला वेळ आणि वीज वाचवण्यासाठी काहीजण एअर फ्रायरच्या बास्केटमध्ये एकदम एकाचवेळी जास्त अन्नपदार्थ भरुन ठेवतात. ही सर्वात मोठी चूक आहे. आपल्या या चुकीमुळेच एयरफ्रायरच्या बास्केटमध्ये ठेवलेले अन्नपदार्थ व्यवस्थित गरम होत नाही. जेव्हा आपण एयरफ्रायरच्या बास्केटमध्ये एकदम एकाचवेळी अन्नपदार्थ गरम होण्यासाठी ठेवतो तेव्हा अन्नाला लागणारी आजूबाजूची गरम हवा अडवली जाते त्यामुळे अन्न व्यवस्थित गरम होत नाही. यामुळे अन्नपदार्थांचा काही भाग हा गरम होतो तर काही भाग तसाच थंड राहतो. एवढेच नाही तर अन्नपदार्थ व्यवस्थित गरम न झाल्यामुळे त्या पदार्थांची चव आणि पोत दोन्ही बदलते. यामुळे एयरफ्रायरच्या बास्केटमध्ये एकदम एकाचवेळी जास्त अन्नपदार्थ भरुन ठेवू नये. 

उपवासाचे फराळाचे पदार्थ करण्यासाठी कोणतं तेल वापरावं? शेफ रणवीर ब्रार सांगतात ' हे ' तेल बेस्ट...

२. चूक २ : टेम्परेचर सेटिंगकडे योग्य प्रकारे लक्ष न देणे. 

अनेकदा एअर फ्रायरमध्ये अन्न गरम करताना, आपण टेम्परेचर सेटिंगकडे जास्त लक्ष देत नाही. यामुळे काहीवेळा आपण तापमान खूप जास्त किंवा खूप कमी सेट करतो. त्यामुळे ही चूक करणे टाळावे. यामुळे तुमच्या अन्नपदार्थांची चव खराब होऊ शकते. उदाहरणार्थ, तापमान खूप जास्त असल्यास, अन्न बाहेरून जळू शकते आणि आतून थंड राहू शकते. त्याचप्रमाणे, तापमान खूप कमी असल्यास, अन्न पुन्हा गरम करण्यासाठी जास्त वेळ लागेल आणि अन्नपदार्थ कोरडे होऊ शकतात. यामुळे टेम्परेचर सेटिंगकडे योग्य प्रकारे लक्ष देणे गरजेचे असते. 

चूक ३ : एयरफ्रायरचे बास्केट उघडून न बघणे. 

 अन्नपदार्थ तयार झाला आहे की नाही हे बघण्यासाठी एयरफ्रायरचे बास्केट वारंवार उघडून न बघणे, ही सर्वात मोठी चूक आहे. अनेकजण एयरफ्रायरच्या बास्केटमध्ये अन्नपदार्थ एकदा ठेवले की टायमर सेट करुन तसेच ठेवतात, परंतु हे चुकीचे आहे. एयरफ्रायरच्या बास्केटमध्ये एकदा का पदार्थ ठेवला की तो थोड्या वेळाने उघडून पाहिला पाहिजे. काहीवेळा असे न केल्याने पदार्थ हिटिंगमुळे जळून जातात. यासाठीच थोड्या - थोड्या वेळाने एयरफ्रायरचे बास्केट उघडून अन्नपदार्थ चेक केले पाहिजे. एखादा अन्नपदार्थ जो लगेच गरम होतो असा पदार्थ एयरफ्रायरच्या बास्केटमध्ये ठेवला असता तो थोड्या वेळाने चेक करत राहणे गरजेचे असते.

आजी आषाढात हमखास करायची तसे लाल भोपळ्याचे घारगे करण्याची पारंपरिक रेसिपी - पावसाळा स्पेशल...

टॅग्स :अन्नकिचन टिप्स