Join us  

तांदूळशिवाय इडली करा झटपट; पाच डाळीची पौष्टिक इडली कधी करून पाहिली आहे का? वेट लॉससाठी बेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2024 6:24 PM

Mix Daal Idli Recipe (With Homemade Idli Batter) : मिश्र डाळीची इडली खाण्याचे आरोग्यदायी फायदे आहेत भन्नाट..

साऊथ इंडियन पदार्थांमध्ये इडली हा पदार्थ फार फेमस आहे (Idli Recipe). इडलीचे अनेक प्रकार केले जातात. डाळ - तांदळाची इडली आपण खाल्लीच असेल. झटपट इडली खाण्याची इच्छा झाल्यावर आपण रवा किंवा पोह्याची इडली करतो (Food). पण आपण कधी डाळींची इडली करून पाहिली आहे का? भारतीय डाळींमध्ये प्रथिनेचे प्रमाण जास्त असते (Cooking Tips). यासह फायबर आणि विविध पौष्टिक घटक आढळते.

अत्यंत पौष्टिक असलेल्या डाळींचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आपण पाच डाळींचा वापर करून पौष्टिक इडली करू शकता. जर आपण डाळ - तांदळाची इडली खाऊन कंटाळले असाल तर, मिश्र डाळींची पौष्टिक इडली करून पाहा. या इडलीमुळे पोट भरेल आणि वेट लॉससाठीही मदत होईल(Mix Daal Idli Recipe (With Homemade Idli Batter)).

मिक्स डाळींची इडली करण्यासाठी लागणारं साहित्य

तूर डाळ

हिरवे मग

चणा डाळ

फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ब्रेड कडक - चवही बिघडली? शेफ म्हणतात १ ट्रिक वापरुन पाहा; मिनिटात ब्रेड फ्रेश

मसूर डाळ

उडीद डाळ

पोहे

मेथी दाणे

मीठ

कृती

सर्वात आधी एका बाऊलमध्ये अर्ध कप तूर डाळ, हिरवे मूग, चणा डाळ, मसूर डाळ, उडीद डाळ आणि त्यात पाणी घालून सर्व डाळी एकत्र धुवून घ्या. डाळी धुवून घेतल्यानंतर त्यात एक कप पोहे आणि चमचाभर मेथी दाणे घाला. नंतर त्यात पाणी घालून ५ ते ६ तासांसाठी डाळी भिजत ठेवा.

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडं ठिसूळ झाली? ३ गोष्टी करून पाहा; वाढेल ताकद - पन्नाशीतही राहाल फिट

५ ते ६ तासानंतर मिक्सरच भांडं घ्या. त्यात भिजलेल्या डाळी घालून वाटून घ्या. आपण त्यात डाळीच पाणी घालू शकता. डाळीची पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्या. नंतर त्यावर झाकण ठेवा. आंबवण्यासाठी ६ तासांसाठी ठेवा. ६ तासानंतर स्टीमरमध्ये पाणी घालून ठेवा.

बॅटरमध्ये चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. इडली पात्राला ब्रशने तेल लावा. त्यात चमचाभर बॅटर ओता. पात्र स्टीमरमध्ये ठेवा. त्यावर झाकण ठेवा. १० ते १५ मिनिटासाठी वाफेवर इडली वाफवून घ्या. १५ मिनिटानंतर इडली पात्रातून इडली बाहेर काढा, व चटणीसोबत सर्व्ह करा. आशाप्रकारे मिश्र डाळींची इडली खाण्यासाठी रेडी. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.