Lokmat Sakhi >Food > सारा तेंडूलकरने घरी केली मोका कॉफी, कशी करतात ही कॉफी, काय स्पेशल?

सारा तेंडूलकरने घरी केली मोका कॉफी, कशी करतात ही कॉफी, काय स्पेशल?

सारा फूडी असून नेहमी काही ना काही प्रयोग करुन आपले खाण्यावरचे प्रेम दाखवून देते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2022 12:55 PM2022-01-13T12:55:17+5:302022-01-13T14:27:46+5:30

सारा फूडी असून नेहमी काही ना काही प्रयोग करुन आपले खाण्यावरचे प्रेम दाखवून देते

Mocha coffee made by Sara Tendulkar at home, how do they make this coffee, what is special? | सारा तेंडूलकरने घरी केली मोका कॉफी, कशी करतात ही कॉफी, काय स्पेशल?

सारा तेंडूलकरने घरी केली मोका कॉफी, कशी करतात ही कॉफी, काय स्पेशल?

Highlightsमोका कॉफी बाहेर घ्यायला गेलो तर काही शे रुपये लागतात, पण घरच्या घरीही ही कॉफी अगदी सहज करता येतेथंडीच्या दिवसांत गरमागरम मोका कॉफी घेतली तर मूड बदलू शकतो.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरची मुलगी सारा तेंडुलकर तिच्या एकाहून एक सुंदर फोटोसाठी नेहमीच चर्चेत असते. कधी कोणासोबत नाव जोडले गेल्यामुळे तर कधी कोणत्या शूटींगमध्ये स्पॉट झाल्यामुळे तिच्याबाबत नेहमी चर्चा होताना दिसते. मात्र यावेळी ती एका वेगळ्याच गोष्टीवरुन चर्चेत आहे, ती म्हणजे तिने स्वत:साठी केलेला मोचा. सचिन तेंडूलकर आणि त्याची मुलगी दोघेही फूडी आहेत. साराच्या सोशल मीडिया पोस्टवरुन तुम्हाला याची कल्पना येऊ शकेल. तिने नुकतीच केलेली एक पोस्ट कॉफी लव्हर्सना खूप आवडेल कारण तिने घरच्या घरी मोका स्टाइल कॉफी कशी करायची हे एका रीलच्या माध्यमातून आपल्या फॅन्सना दाखवले आहे. आता मोका म्हणजे काय हे काहींना माहित असेल पण ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी कॉफीच्या या प्रकाराबद्दल जाणून घेऊया...


क्लिपच्या सुरुवातीला एका छानशा काचेच्या कपात साराने लिक्विड चॉकलेट घातल्याचे आपल्याला दिसते. हे चॉकलेट ती अतिशय सुंदर पद्धतीने कपात पसरुन घेते. त्यावर ती वाफाळती कोरी कॉफी घालते आणि त्यानंतर त्यावर योग्य त्या प्रमाणात दूध आणि त्या दुधाचा आलेला फेस घालते. सगळ्यात शेवटी ती त्यावर चिमटीने कोको पावडर घालत असल्याचे दिसते. मंगळवारच्या सकाळी मोका असे तिने आपल्या या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. ही कॉफी दिसायला इतकी टेम्प्टींग दिसत आहे, की तो व्हिडिओ पाहून आपल्यालाही गरमागरम कॉफी प्यायची इच्छा झाली नाही तरच नवल. थंडीच्या दिवसांत अशाप्रकारे कॉफीचा मग हातात घेऊन त्याचा आस्वाद घेण्याची मजाच काही और. सोशल मीडियावर साराचे फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे. त्यामुळे एका दिवसात साराच्या या पोस्टला जवळपास ८० हजार लाइक्स आले असून कॉफीवर मनापासून प्रेम करणाऱ्या अनेकांनी तिच्या या पोस्टला कमेंटही केल्या आहेत.     

(Image : Google)
(Image : Google)

याआधीही साराने खाण्याच्या पदार्थांचे बरेच फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केल्याचे दिसून आले होते. नुकतेच तिने गोव्यातील काही फोटो अपलोड केले होते ज्यामध्ये तिने मायक्रोग्रीन्स, सॅलेड, कोल्ड कॉफीसारखे काहीतरी पेय आणि आणखी बरेच प्रकार दिसत होते. साराबरोबरच तिची आई अंजली आणि वडील सचिन यांचेही खाण्यावर मनापासून प्रेम असल्याने ते सतत नवीन काही ना काही ट्राय करत असतात. तसेच पारंपरिक पदार्थही त्या सगळ्यांना खूप आवडतात हे आपण त्यांच्या वेगवेगळ्या पोस्टमधून पाहिलेच आहे.  

कशी करतात मोका कॉफी ? 

१. यासाठी लिक्विड चॉकलेट लागते ते बाजारात सहज उपलब्ध होते.

२. कॉफी पावडर, कोको पावडर आणि मिल्क पावडर यांचे मिश्रण तुम्ही या तिन्ही गोष्टी समप्रमाणात घेऊन करुन ठेऊ शकता. 

३. कॉफी करायच्या वेळी तुम्हाला आवडेल तितके लिक्विड चॉकलेट किंवा चोको चिप्स घालून यामध्ये तयार केलेली कॉफीची पूड आणि उकळलेले दूध घालायचे.

४. तुम्हाला आवडत असेल तर वरती पुन्हा चॉकलेच वेफर, चॉकलेट चिप्स, लिक्वि़ड चॉकलेट यांचा समावेश करु शकता. या कॉफीमुळे तुम्हाला तरतरी तर येतेच पण चॉकलेट असल्यामुळे आनंदीही वाटते. 

५. थंडीच्या दिवसांत ही गरमागरम कॉफी प्यायल्याने मन प्रफुल्लित व्हायला मदत होते आणि आलेला थकवा निघून जातो. 

Web Title: Mocha coffee made by Sara Tendulkar at home, how do they make this coffee, what is special?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.