गणपती म्हटलं की सगळ्यात आधी डोळ्यासमोर येतात ते म्हणजे मोदक. उकडीचे मोदक बनवायचे असतील उकड काढण्यपासून ते सारण बनवण्यापर्यंत खूपच वेळ लागतो. (Modak Recipe) अनेकांना उकडीचे मोदक बनवणं किचकट वाटतं. याऊलट रवा, बेसनाचे मोदक बनण्यासाठी तुम्हाला जास्तवेळ लागणार नाही आणि कमी वेळात स्वादीष्ट नैवेद्य तयार होईल. अगदी ३ ते ४ पदार्थ वापरून तुम्ही हे मोदक बनवू शकता. (How to make rava besan modak)
साहित्य
1 कप पातळ रवा
1 कप बेसन पीठ
दीड वाटी साखर
१ चमचा वेलची पूड
दीड वाटी तूप
ड्रायफ्रुट्स आवडीनुसार
कृती
- सगळ्यात आधी रवा आणि बेसन पीठ वेगवेगळे तुपान भाजून बाजूला काढून घ्या.
- नंतर साखर बुडेल एवढे पाणी घालून पाणी गॅसवर ठेवून एकतारी पाक तयार करून घ्या. पाक तयार झाल्यानंतर त्यात रवा आणि बेसन घाला.
- दोन्ही पीठं घालून चांगली एकजीव होईपर्यंत मिसळा. आता त्यात वेलची पावडर, ड्रायफ्रुट्सचे तुकडे घाला आणि एकजीव करा.
- नंतर झाकण ठेवून किमान पंधरा ते वीस मिनिटे तसेच ठेवा. कारण झाकून ठेवल्यावर रवा फूलतो .
- मग चमचाने गोळे करून घ्या आणि मोदाकाच्या साच्यात घट्ट दाबून घ्या. तयार आहेत झटपट होणारे रवा बेसनाचे मोदक