गणेशोत्सव म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर आधी मोदक येतात (Food). हो ना? मोदक अनेक प्रकारचे केले जातात. उकडीचे आणि तळणीचे मोदक घराघरात आवर्जून केले जातात. पण मोदक बनवणं वाटतं तितकं सोपं नाही (Ganeshotsav). उकडीचे मोदक हे सहसा तांदूळाच्या पिठाच्या तयार केले जातात (Modak). पण तांदळाचे मोदक कधी फुटतात तर कधी सारण सैलसर होते. ज्यामुळे मोदक व्यवस्थित तयार होत नाही.
मोदक जर बिघडू नये, शिवाय मऊ, सुबक व्हावे असे वाटत असेल तर, काही टिप्स फॉलो करून पाहा. जर घरात तांदळाचे पीठही नसेल तर, तांदळाचे मोदक कसे करायचे? पाहा. मोदक अजिबात बिघडणार नाही(Modak Recipe | Ukadiche modak (With & Without Mould)).
तांदळाचे मोदक करण्यासाठी लागणारं साहित्य
तांदूळ
दूध
पाणी
खोबरं
ड्रायफ्रूटस
गूळ
ऐन तारुण्यात हाडं ठणठणकतात? रोज खा १ पौष्टिक लाडू; गुडघेदुखी विसराल - केसही होतील दाट
वेलची पूड
कृती
सर्वात आधी एका बाउलमध्ये एक कप तांदूळ घ्या. त्यात पाणी घालून तांदूळ धुवून घ्या. तांदूळ धुवून घेतल्या नंतर त्यात पाणी घालून भिजत ठेवा. ३ तास तांदूळ भिजत ठेवा. ३ तासानंतर मिक्सरच्या भांड्यात भिजलेले तांदूळ आणि अर्ध कप पाणी घालून पेस्ट तयार करा.
एका भांड्यावर चाळण ठेवा. त्यावर तांदळाची पेस्ट ओतून गाळून घ्या. त्यात अर्ध कप दूध आणि एक चमचा तूप घालून मिक्स करा. गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवा. मिडियम फ्लेमवर चमच्याने ढवळत राहा. घट्ट झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवा. ५ मिनिटानंतर गॅस बंद करा. आता परातीत उकड काढून घ्या. त्यात थोडे पाणी शिंपडून उकड मळून घ्या.
ताटात हेल्दी पदार्थ असूनही शरीराला मिळणार नाही पोषण; तज्ज्ञ सांगतात 'या' पद्धतीने जेवत असाल तर..
दुसरीकडे कढई गरम करण्यासाठी ठेवा. त्यात २ चमचे तूप घाला. तूप गरम झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेले ड्रायफ्रूटस, एक कप किसलेलं खोबरं, एक कप किसलेला गूळ आणि वेलची पूड घालून सारण रेडी करा.
आता उकडीचा एक छोटा गोळा घ्या, पारी तयार करून त्यात सारण भरा, आणि मोदकाचा आकार द्या. कळीदार मोदक तयार झाल्यानंतर स्टीमरमध्ये ठेवा. १० मिनिटांसाठी वाफवून घ्या. अशाप्रकारे मऊ कळीदार मोदक खाण्यासाठी रेडी.