Join us  

आपल्या माणसांसाठी प्रेमाने करा मोहब्बत - ए - शरबत, रिफ्रेशिंग ज्यूस - उन्हाचा त्रास करेल छुमंतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2023 12:13 PM

Mohabbat ka Sharbat | Watermelon Rose Drink घरच्या घरी करा मोहब्बत - ए - शरबत, कमी साहित्यात ५ मिनिटात ज्यूस रेडी..

गरमीच्या दिवसात शरीराला थंडवा देणारे पदार्थ व पेय हवेहवेसे वाटतात. हे पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. महाराष्ट्रात लिंबू - सोडापासून, ताक, लस्सी, विविध फळांचे ज्यूस मिळतात. या पेयाच्या सेवनाने गरमीपासून आराम मिळतो. पण आपण कधी मोहब्बत - ए - शरबत हा ज्यूस ट्राय केला आहे का? या हंगामात कलिंगड मोठ्या प्रमाणावर मिळतात.

हा रिफ्रेशिंग फ्रुट शरीराला हायड्रेट ठेवते.  मोहब्बत - ए - शरबतमध्ये अधिक करून कलिंगडाचे वापर करण्यात येतो. हे रिफ्रेशिंग ड्रिंक इफ्तार - पार्टीमध्ये पाहुण्यांना सर्व्ह करण्यात येते. आपण देखील हे हटके ज्यूस घरी आलेल्या पाहुण्यांना देऊ शकता. चला तर मग या रिफ्रेशिंग ज्यूसची कृती पाहूयात(Mohabbat ka Sharbat | Watermelon Rose Drink).

मोहब्बत - ए - शरबतसाठी लागणारं साहित्य

दूध

पाणी

रूह अफजा सिरप

हॉटेलसारखा गोलगरगरीत छिद्र असलेला मेदूवडा करायचाय? १ पळी फक्त हवी, सॉफ्ट-हलका मेदूवडा तयार

साखर

कलिंगडाचे काप

बर्फ

कृती

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये थंड दूध घ्या, त्याच्यापेक्षा कमी प्रमाणात थंडगार पाणी मिक्स करा. आता त्यात दोन चमचे रोझ किंवा रूह अफजा सिरप, दोन चमचे साखर घालून मिक्स करा.

उन्हाळ्यात करा विकतसारखे ऑरेंज पॉप्सिकल, कमी साहित्यात १० मिनिटात - गारेगार पॉप्सिकल रेडी

साखर विरघळल्यानंतर त्यात फ्रेश कलिंगडाचे छोटे तुकडे घाला, आपल्या आवडीनुसार आपण इतरही फळे मिक्स करू शकता. आता त्यात बर्फाचे तुकडे घालून ज्यूस चमच्याने ढवळत राहा. अशा प्रकारे रिफ्रेशिंग मोहब्बत - ए - शरबत पिण्यासाठी रेडी. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स