पावसाळ्याच्या दिवसात मक्याचे दाणे खाण्याचा आनंदच काही वेगळा असतो. प्रत्येक ठिकाणी मक्याचे स्टॉल दिसतात. तिखट-मीठ आणि लिंबू लावलेले मके पाहिल्यानंतर ते खाण्याचा मोह आवरला जात नाही. (Monsoon Special Health Benefits of Corn or Bhutta) चटपटीत मका खाणं जिभेला जितकं सुखावणारं वाटतं तितकंच तब्येतीसाठीही मका उत्तम ठरतो. मक्याचे कणीस खाण्याचे फायदे समजून घेऊया. (Top 5 reasons why corn or bhutta is an ideal snack)
1) कार्बोहायट्रेट उर्जेचे प्रमुख स्त्रोत मानले जाते. मक्यात कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणात असतात. मका खाल्ल्यानं पोट भरतं याशिवाय भरपूर उर्जा मिळते. मक्क्यातील कार्ब्स आपल्या शरीरात शोषले जातात आणि दीर्घकाळ पोट भरल्यासारखं वाटतं आणि उर्जा टिकून राहण्यास मदत होते.
2) मक्यात एंटी ऑक्सिडेंटस आणि फ्लेवोनॉईड्स भरपूर असतात. यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो. यातील एंटीऑक्सिडंस हानिकारक फ्री रेडिकल्स कंपाऊंडच्या नकारात्मक प्रभावांना निष्क्रीय करतात. ज्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो. याव्यतिरिक्त मक्यात फेरूलिक एसिड असते जे स्तन आणि लिव्हरमधील टयूमरचा आकार कमी करण्यात महत्वाची भूमिका बजावतात.
3) जसजसं वय वाढतं तसतसं फ्री रॅडिकल्समुळे सुरकुत्या येऊ लागतात. कॉर्न beta-carotene ने परीपूर्ण असते. यातील व्हिटामी ए, व्हिटामीन सी आणि इतर एंटीऑक्सिडंट्स तुमची त्वचा निरोगी ठेवण्यास आणि वय वाढीच्या लक्षणांना रोखण्यास मदत करतात.
4) मका मॅग्नेशियम, आयर्न, फॉस्फरस यांसारख्या खनिजांनी परीपूर्ण असतो. यामुळे हाडं निरोगी राहण्यास मदत होते. यामुळे संधीवातासारख्या समस्या टाळता येतात. मक्यात बीटा कॅरोटनीन भरपूर प्रमाणात असते. यामुळे व्हिटामीन ए वाढण्यास मदत होते. व्हिटामिन तुमची दृष्टी सुधारण्यास आणि डोळ्यांसंबंधित समस्या रोखण्यास फायदेशीर ठरते.
5) स्वीटकॉर्नमध्ये फोलेट देखील भरपूर असते, ज्याला व्हिटॅमिन बी9 देखील म्हणतात. हे पोषक तत्व आपल्या शरीरासाठी अनेक प्रकारे कार्य करते. गर्भधारणेदरम्यान महिलांसाठी हे विशेषतः महत्वाचे आहे. खरं तर, फोलेट निरोगी लाल रक्तपेशींच्या निर्मितीमध्ये आणि गर्भाशयात बाळाच्या विकासात योगदान देते.