Join us  

कपभर रवा आणि बेसनाची करा कुरकुरीत वडी; झटपट रेसिपी-मुलांच्या डब्यासाठी बेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2024 4:52 PM

Monsoon Special - Rava - Besan Vadi; best recipe for Tiffin : घरात कोथिंबीर, पालक नसेल तर, बेसन आणि रव्याची वडी करून पाहा..

जेवणाच्या ताटामध्ये लोणचे, पापड, भजी आणि वडी असल्यावर जेवणाची रंगत वाढते (Monsoon Special). पावसाळ्यात भजी आपण करतोच. काहींना भजी आवडते, तर काहींना वडी खायला आवडते (Rava-besan vadi). वडी अनेक प्रकारची केली जाते. पालक, मेथी, कोथिंबीरीची वडी आपण खाल्लीच असेल. पण आपण कधी रवा बेसनाची वडी खाऊन पाहिली आहे का?

रवा बेसनाची वडी करायला तशी सोपी (Food). शिवाय चवीलाही भन्नाट लागते. जर आपल्याला रोजचे वडीचे प्रकार खाऊन कंटाळा आला असेल तर, एकदा रवा बेसनाची वडी करून पाहा (Cooking Tips). झटपट रेसिपी काही मिनिटात तयार होईल. आपण हा वडीचा प्रकार खास मुलांसाठी टिफिनमध्ये त्यांना तयार करून देऊ शकता(Monsoon Special - Rava - Besan Vadi; best recipe for Tiffin).

रवा बेसनाची वडी कशी करायची?

लागणारं साहित्य

बेसन

रवा

पाणी

तेल

धो धो पावसात कुरकुरीत पालक-बटाटा भजी खाण्यासारखं सुख नाही, खमंग भजी करण्याची पाहा रेसिपी

जिरं

कडीपत्ता

हिरवी मिरची

जिरे पावडर

धणे पूड

मीठ

हळद

लाल तिखट

कृती

सर्वात आधी एका बाऊलमध्ये एक कप बेसन घ्या. त्यात एक कप रवा आणि पाणी घालून मिक्स करा. गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवा. त्यात एक चमचा तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा जिरं, कडीपत्ता, बारीक चिरलेली हिरवी मिरची, एक चमचा जिरे पावडर, धणे पूड, चवीनुसार मीठ, चिमुटभर हळद आणि लाल तिखट घालून मिक्स करा.

कपभर गव्हाच्या पीठाचे करा चमचमीत धिरडे; शाळेच्या डब्यासाठी बेस्ट पर्याय, १५ मिनिटांत चमचमीत पदार्थ

मसाले भाजून घेतल्यानंतर त्यात तयार बॅटर ओतून मिक्स करा. मिडीयम फ्लेमवर गॅस ठेवा. मिश्रण शिजल्यानंतर एका प्लेटला ब्रशने थोडे तेल लावून त्यावर काढून पसरवा. सुरीने वड्या कापून घ्या. एका कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात वड्या सोडून खरपूस तळून घ्या. अशा प्रकारे रवा बेसनाच्या वड्या खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स