Join us  

पावसात बेसनाच्या भज्यांनी त्रास होतो, करा तांदुळाची कुरकुरीत भजी- ‘ही’ पद्धत पाहा-मनसोक्त भजी खा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2024 10:00 AM

Monsoon Special : Rice Pakora | Crispy Chawal Ke Pakode : एकदा कपभर तांदुळाची कुरकुरीत भजी करून पाहाच..

पावसाळा सुरु झाला की, खवय्यांची चंगळ असते (Monsoon Special). मका, चहा आणि भज्यांच्या स्टॉलवर गर्दी जमते. विशेषतः वडे आणि भजी खाण्यासाठी लोक गर्दी करतात. आपण सगळ्यांनी पावसाळ्यात भजी हमखास खाल्ली असेल. भजी अनेक प्रकारची केली जाते (Tandulachi bhaji). कांदा, बटाटा, पालक, मका आणि इतर भाज्यांच्या कुरकुरीत भज्या केल्या जातात.

भजी करण्यासाठी बेसनाचा वापर होतो (Rice Pakoda). बेसनाची भजी कॉमन आहे. पण आपण कधी तांदुळाची भजी खाऊन पाहिली आहे का? आता तुम्ही म्हणाल तांदुळाची खीर किंवा भात होतो. भजी कसं शक्य आहे? (Cooking Tips) जर बेसनाची भजी खाऊन कंटाळा आला असेल किंवा काहीतरी वेगळं खायचं असेल तर, तांदुळाची भजी करून पाहा. आपल्याला नक्कीच आवडेल(Monsoon Special : Rice Pakora | Crispy Chawal Ke Pakode).

तांदुळाची भजी करण्यासाठी लागणारं साहित्य

तांदूळ

उकडलेले बटाटे

चेहऱ्याला लावा ‘अशी’ साय; मुरुमांचे डाग- निस्तेज चेहरा महिनाभरात गायब, महागड्या क्रिमपेक्षा असरदार उपाय

जिरे

हिरवी मिरची

कोथिंबीर

बेकिंग सोडा

मीठ

कृती

एका बाऊलमध्ये एक वाटी तांदूळ घ्या. त्यात पाणी घालून धुवून घ्या. नंतर त्यात पुन्हा पाणी घालून झाकण लावा. ३ तासांसाठी तांदूळ भिजत ठेवा. ३ तासानंतर मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले तांदूळ घालून वाटून घ्या. एका बाऊलमध्ये उकडलेले बटाटे किसून घ्या. नंतर त्यात तांदुळाची पेस्ट, एक चमचा जिरं, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, चिमुटभर बेकिंग सोडा आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. १० मिनिटांसाठी त्यावर झाकण ठेवा.

५ भाज्या नियमित खा, प्रोटीन मिळेल भरपूर- पन्नाशीतही दुखणार नाहीत हाडं- प्रोटीन पॉवरहाऊसची कमाल

दुसरीकडे कढई गरम करण्यासाठी ठेवा. त्यात बॅटरचे छोटे गोळे सोडून तळून घ्या. भाजी तळताना गॅस मध्यम आचेवर ठेवा. जेणेकरून भजी जास्त तेल पिणार नाही. भज्यांना ब्राऊन रंग आल्यानंतर टिश्यू पेपरवर काढून घ्या. अशा प्रकारे कच्च्या तांदुळाचे झटपट कुरकुरीत भजी खाण्यासाठी रेडी. आपण तांदुळाची भजी खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.