पावसाळा जितका आनंद देतो तितक्याच समस्याही घेऊन येतो. पावसाळ्यात आपल्याला होणारे वेगवेगळे आजारपण, फंगल इंन्फेक्शन्स, रॅशेस, त्याचबरोबर घरातील कुबट दुर्गंधी, वातावरणातला ओलावा, किचनमधील पदार्थ खराब होणे अशा या ना त्या समस्या पावसात येतच असतात. यातील साठवणीचे पदार्थ खराब होणे, फळं - भाज्या यांना लगेचच बुरशी येणे, काही अन्नपदार्थ दमट वातावरणामुळे सडून खराब होणे अशा किचनमधील अनेक समस्या गृहिणींना त्रास देत असतात.
काहीवेळा भरपूर पावसामुळे आपल्याला घराबाहेर पडता येणार नाही म्हणून भाज्या - फळ किंवा इतर खायचे अन्नपदार्थ हे एकाच वेळी आणून एकदम घरात साठवून ठेवतो. एकतर पावसाळ्यात फळं - भाज्या यांचे दर अधिकच वाढलेले असतात. अशातच ते एकावेळी खरेदी करून घरी आणून स्टोअर करून ठेवल्यास खराब होतात. यामुळे कित्येकदा या खराब झालेल्या भाज्या व फळं फेकून द्यावी लागतात. यासाठी पावसाळ्यात जर आपण फळं, पालेभाज्या विकत आणल्या तर त्या नेमक्या कशा स्टोअर करून ठेवाव्यात जेणेकरुन त्या दीर्घकाळ टिकतील व खराब होणार नाहीत, यासाठी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवूयात(Monsoon Vegetable Hacks: How To Buy And Store Them Properly To Prevent Them From Getting Spoiled).
पावसाळ्यात फळं व पालेभाज्या स्टोअर करुन ठेवण्याची सोपी ट्रिक...
१. कोमट पाणी व व्हिनेगरचा वापर करा :- पावसाळ्यात फळं व भाजीपाला बाजारांतून विकत आणल्यानंतर तो सर्वात आधी स्वच्छ करणे गरजेचे असते. पावसाळ्यात फळं, भाजीपाला व्यवस्थित धुवून ठेवला पाहिजे. पावसाळ्यात वातावरणातील दमटपणा आणि ओलाव्यामुळे फळे आणि भाज्यांमध्ये बॅक्टेरिया यांची वाढ लगेच होते, ज्यामुळे ते लवकर खराब होतात. यासाठीच फळे व भाजीपाला स्टोअर करून ठेवण्याआधी, एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यात २ टेबलस्पून व्हिनेगर मिसळून घ्यावे. या मिश्रणात फळे व भाजीपाला १० ते १५ मिनिटांसाठी भिजत ठेवावा. त्यानंतर बाहेर काढून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा.
सुके खोबरे खवट होते, काळे पडते ? २ उपाय, खोबरे टिकेल भरपूर...
२. भाजीपाला पूर्णपणे सुकवा :- पावसाळ्यात भाजीपाला जास्त काळ टिकवून ठेवायचा असेल, तर त्या नीट धुण्याबरोबरच त्या वाळवल्या देखील पाहिजेत. कारण भाजीपाला व्यवस्थित वाळवला नाही तर तो कुजण्याची शक्यता अधिक असते. अशावेळी, जेव्हा आपण भाज्या धुतो, त्यानंतर त्या टिश्यू पेपर किंवा सुती कापडाने पूर्णपणे पुसून ठेवल्या पाहिजेत. एका स्वच्छ सुती कापडाने पुसून किंवा व्यवस्थित वाळवून फळे व भाजीपाला फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवावा. यामुळे फळे व भाजीपाला खराब न होता दीर्घकाळ टिकतो. याचबरोबर आपण स्वच्छ धुवून घेतलेली फळे व भाजीपाला सुती कापड अंथरून त्यावर पसरवून वाळण्यासाठी ठेवू शकतो.
पावसाळ्यात मीठ व साखरेला ओलसरपणा येऊन गुठळ्या तयार होतात ? ६ सोप्या घरगुती टिप्स...
३. या ठिकाणी भाजी कधीही ठेवू नका :- फळे, भाजीपाला दीर्घकाळ टिकवून ठेवायचा असल्यास त्याचबरोबर पावसाळ्यात त्या ताज्या ठेवायच्या असतील, तर त्या नीट धुवून कोरड्या कराव्यात आणि थंड किंवा हवेशीर जागी ठेवाव्यात. यामुळे भाज्या नेहमी ताज्या राहतात. त्यांचे नुकसान होण्याचा धोकाही कमी असतो. यासोबतच फळे, भाज्या ओलावा किंवा दमट जागी चुकूनही ठेवू नका.
महागडे टोमॅटो विकत आणलेत ? लवकर खराब होऊ नयेत म्हणून १ खास टिप...
महागडा सुकामेवा पावसाळ्यात सादळू नये म्हणून ४ टिप्स, बदाम-काजू-अंजीर टिकतील छान...
भाज्या, फळं, पालेभाज्या फ्रिजमध्ये साठवण्यासाठी इतर काही सोप्या टीप्स समजून घेऊयात...
१. फळं आणि भाज्या कधीच प्लास्टिकच्या हवाबंद पिशवी किंवा डब्यात ठेवू नका.
२. भाज्या आणि फळं एकत्र साठवून ठेवू नयेत असं केल्यास त्या लवकर सडतात.
३. कंदमुळे साठवून ठेवण्यापूर्वी त्याच्या देठाकडचा भाग कापून घ्या आणि मग साठवून ठेवा. असे केल्यास कंदमुळे जास्त काळ टिकतात.
४. नाजूक फळं जसे की स्टॉबेरी, ब्लू बेरी, अंजीर अथवा टोमॅटो सारख्या भाज्या एकमेंकांवर ठेवू नका.
५. पालेभाज्या निवडून, धुवून आणि सुकवून टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून ठेवा.
६. एखादी भाजी किंवा फळं खराब झालं तर ते लगेच इतर भाज्या आणि फळांपासून वेगळं करा नाहीतर त्यामुळे इतर भाज्या, फळं खराब होतात.