Lokmat Sakhi >Food > मूगडाळ खिचडी नेहमीचीच, ही उडीद डाळ खिचडी खाऊन पाहा! संजीव कपूर स्पेशल पौष्टिक रेसिपी

मूगडाळ खिचडी नेहमीचीच, ही उडीद डाळ खिचडी खाऊन पाहा! संजीव कपूर स्पेशल पौष्टिक रेसिपी

उत्तर प्रदेशात उडदाच्या डाळीची खिचडी मकर संक्रातीला आवर्जून केली जाते. पण या खिचडीचे फायदे बघता ही खिचडी पावसाळ्यात , हिवाळ्यात अगदी उन्हाळ्यात खाल्ली तरी आरोग्यास फायदेशीर ठरते. रात्रीच्या जेवणापेक्षाही ती सकाळी नाश्त्याला खाणं जास्त लाभदायक मानलं जातं.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 05:41 PM2021-08-18T17:41:02+5:302021-08-18T17:50:08+5:30

उत्तर प्रदेशात उडदाच्या डाळीची खिचडी मकर संक्रातीला आवर्जून केली जाते. पण या खिचडीचे फायदे बघता ही खिचडी पावसाळ्यात , हिवाळ्यात अगदी उन्हाळ्यात खाल्ली तरी आरोग्यास फायदेशीर ठरते. रात्रीच्या जेवणापेक्षाही ती सकाळी नाश्त्याला खाणं जास्त लाभदायक मानलं जातं.

Moogdal khichdi as usual, try this urad dal khichdi! Sanjeev Kapoor Special Nutritious Recipe | मूगडाळ खिचडी नेहमीचीच, ही उडीद डाळ खिचडी खाऊन पाहा! संजीव कपूर स्पेशल पौष्टिक रेसिपी

मूगडाळ खिचडी नेहमीचीच, ही उडीद डाळ खिचडी खाऊन पाहा! संजीव कपूर स्पेशल पौष्टिक रेसिपी

Highlights उडदाची डाळ पौष्टिक असते. पांढर्‍या आणि काळ्या उडीद डाळीपैकी काळी उडदाची डाळ पौष्टिक असते.उडदाच्या डाळीची खिचडी वरचेवर खात राहिली तर वजन कमी होण्यास मदत होते.उडदाच्या डाळीच्या खिचडीत आपण आपल्या आवडीच्या भाज्या घालून तिला आणखी पौष्टिकही करु शकतो. छायाचित्रं- गुगल

तूर, मूग, मसूर, कडधान्यं यांची खिचडी आपण नेहेमीच करतो. पण सालीच्या उडदाच्या डाळीची खिचडीही केली जाते. हा काही आगळा वेगळा प्रकार नाही. फक्त ही खिचडी जास्त जणांना माहित नाही एवढंच. उत्तर प्रदेशात उडदाच्या डाळीची खिचडी मकर संक्रातीला आवर्जून केली जाते. पण या खिचडीचे फायदे बघता ही खिचडी पावसाळ्यात , हिवाळ्यात अगदी उन्हाळ्यात खाल्ली तरी आरोग्यास फायदेशीर ठरते. रात्रीच्या जेवणापेक्षाही ती सकाळी नाश्त्याला खाणं जास्त लाभदायक मानलं जातं.

छायाचित्र- गुगल

उडदाची खिचडी कशी कराल?

उडदाची खिचडी करण्यासाठी 1 कप तांदूळ, 1 कप उडदाची सालीची डाळ, 3-4 चमचे साजूक तूप, 1 चमचा जिरे, 2 चमचे अद्रक, 2 हिरव्या मिरच्या, एक छोटा चमचा हिंग, हळद, मीठ, आणि तांदूळ आणि डाळीच्या अडीच पट पाणी एवढं जिन्नस लागतं.

उडदाची खिचडी करताना आधी तांदूळ धुवून एक तास भिजवावे आणि उडदाची डाळ धुवून तीही अर्धा तास भिजवावी. तांदूळ आणि डाळ वेगवेगळी भिजवावी. कुकरमधे दोन चमचे तूप घालून ते गरम करावं. ते गरम झालं की त्यात जिरे, चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि किसलेलं अद्रक घालून ते एक दोन मिनिटं परतून घ्यावं. त्यानंतर त्यात आधी तांदूळ घालावेत. ते थोडे परतून घ्यावेत. उडदाची डाळ घालावी. हे चांगलं परतून घेतलं की त्यात अर्धा चमचा हळद आणि मीठ घालावं. नंतर त्यात पाणी गरम करुन घालावं. खिचडीत पाणी घातल्यावर त्याला उकळी आली की कुकरचं झाकण लावून 4-5 शिट्या घ्याव्यात. कुकरची वाफ पूर्ण गेली की कुकर उघडावा. पुन्हा कुकरखाली गॅस लावावा. तयार खिचडीवर दोन चमचे तूप घालावं. पाव कप गरम पाणी खिचडीवर घालावं. दोन ते तीन मिनिटं कुकरला झाकण न लावताच खिचडी मंद आचेवर ठेवावी. नंतर गॅस बंद करुन त्यावर कोथिंबीर भुरभुरावी. उडदाच्या डाळीच्या खिचडीत आपण आपल्या आवडीच्या भाज्या घालून तिला आणखी पौष्टिकही करु शकतो.

छायाचित्र- गुगल

उडीद डाळीची खिचडी खाण्याचे फायदे

उडदाची डाळ पौष्टिक असते. पांढर्‍या आणि काळ्या उडीद डाळीपैकी काळी उडदाची डाळ पौष्टिक असते. काळ्या उडदाच्या डाळीत प्रथिनं, ब आणि क जीवनसत्त्वं, थायमीन, रायबोफ्लेविन, नियासीन, लोह आणि कॅल्शियम हे घटक असतात. या डाळीची खिचडी खाल्ल्याने पचनक्रिया चांगली होते. सकाळी नाश्त्याला उडदाच्या डाळीची खिचडी खाल्ल्यास ती आरोग्यास जास्त फायदेशीर ठरते.

1. सकाळी नाश्त्याल उडदाच्या डाळीची खिचडी खाल्ल्यानं कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. या खिचडीतून शरीराला भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम, फोलेट मिळतात. या घटकांमुळे रक्तवाहिन्यांमधे गुठळ्या होत नाही. हदय निरोगी ठेवण्यासाठी मॅग्नेशियम हा घटक खूप महत्त्वाचा असतो. या घटकामुळे रक्त प्रवाह सुधारतो.

2. सालीच्या उडीद डाळीतून मोठ्या प्रमाणात फायबर मिळतं. त्यामुळे पचन सुधारण्यासोबतच या डाळीच्या खिचडीमुळे रक्तातील इन्शुलिन आणि ग्लुकोजची पातळी नियंत्रित राहाते.

3. स्नायुंच्या विकासात प्रथिनांचं महत्त्व खूप आहे. शाकाहारी लोकांना काळ्या उडदाच्या डाळीतून मोठ्या प्रमाणात प्रथिनं मिळतात. ही प्रथिनं त्वचा, रक्त, स्नायू आणि हाडांच्या पेशींचा विकास करतात.

4. शरीरात लोहाची कमतरता असेल तर काळ्या उडदाच्या डाळीला प्राधान्य द्यावं. या डाळीत लोहाचं प्रमाण खूप असतं. सालीच्या उडदाच्या डाळीची खिचडी खाल्ल्याने शरीराला लोह मिळतं, ताकद मिळते. मासिक पाळी असताना महिलांनी सालीच्या उडदाच्या डाळीची खिचडी अवश्य खावी. कारण या दिवसात शरीरातून कमी होणारं लोह भरुन निघतं.

5. पोटाशी निगडीत समस्या भेडसावत असतील तर उडदाच्या डाळीची खिचडी वरचेवर खात राहावी. या डाळीमधे मोठ्या प्रमाणावर फायबर असल्यानं या खिचडीच्या सेवनानं या फायबरचा उपयोग चयापचय क्रिया सुधारण्यावर होतो. त्यामुळे पोटाच्या सम्स्या दूर होतात. डाळीतील फायबर मुळे आणि या डाळीमुळे चयापचय क्रिया सुधारत असल्याने सालीच्या उडदाच्या डाळीची खिचडी खाल्ल्यानं वजन कमी होण्यासही मदत होते. 

Web Title: Moogdal khichdi as usual, try this urad dal khichdi! Sanjeev Kapoor Special Nutritious Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.