Join us

मुळ्याचे रायते करण्याची रेसिपी, हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2024 13:34 IST

Food And Recipe: मुळ्याचं रायतं करण्याची ही एक सोपी रेसिपी पाहा (mooli ka raita recipe).. अगदी ५ मिनिटांत रायतं तयार होईल शिवाय ते खूप चविष्ट असेल.(mulyachi koshimbir recipe in Marathi)

ठळक मुद्देया रेसिपीने केलेलं रायतं एकदा जेवणात तोंडी लावून पाहाच..

हिवाळ्याच्या दिवसांत बाजारातून फेरफटका मारला की रसरशीत फळं, हिरव्यागार भाज्या, लालबुंद गाजर आपलं लक्ष वेधून घेतात. यांच्या बरोबरीनेच आणखी एका भाजीकडे आपलं लक्ष हमखास जातंच.. आणि ती भाजी म्हणजे पांढराशुभ्र मुळा. पांढरा चमकदार मुळा पाहिला की तो हमखास घ्यावाच वाटतो. म्हणूनच तो अवश्य घ्या आणि घरी आणून त्याचं चटकदार रायतं करून खा. एरवी आपल्या जेवणात वेगवेगळ्या कोशिंबीर तर असतातच. पण मुळा मात्र हिवाळ्यातच असतो. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसांत इतर सगळ्या कोशिंबीरी बाजुला ठेवा आणि मुळ्याचं हे रायतं किंवा कोशिंबीर आवर्जून करून खा (mooli ka raita recipe). एरवी मुळ्याला पाहून नाक मुरडणारेही मुळ्याचं रायतं मागून मागून खातील (how to make muli ka raita?). कारण त्यामुळे खरंच जेवणाची रंगत वाढते.(mulyachi koshimbir recipe in Marathi)

मुळ्याचं रायतं करण्याची रेसिपी 

 

साहित्य

अर्धा मुळा

अर्धा ते पाऊण वाटी दही

१ टीस्पून साखर

२ हिरव्या मिरच्या आणि ५ ते ७ कडिपत्त्याची पाने

नऊवारी नेसून टिपिकल मराठी लूक करायचा? मग 'हे' अस्सल मराठी दागिने तुमच्याकडे आहेत का बघा

१ टीस्पून मोहरी आणि जिरे

चिमूटभर हिंग

चवीनुसार मीठ

फोडणीसाठी तेल 

१ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर

 

कृती

सगळ्यात आधी मुळा स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर त्याची सालं काढून तो किसून घ्या.

किसलेला मुळा एका भांड्यात काढा. मुळा किसण्यासाठी मध्यम आकाराची छिद्रं असणारी किसनी वापरावी. 

बघताक्षणीच करा गोड संत्रीची पारख, बघा लगेच कसा ओळखायचा गोड आणि आंबट संत्रीमधला फरक

दही फेटून घ्या आणि त्यानंतर किसलेल्या मुळ्यामध्ये घाला. त्याचवेळी त्यामध्ये चवीनुसार साखरही घाला. 

आता गॅसवर एक छोटी कढई गरम करायला ठेवा. कढई गरम झाली की तेल, मोहरी, जिरे, हिंग, मिरच्यांचे तुकडे आणि कडिपत्ता टाकून फोडणी करून घ्या.

 

छान तडतडलेली खमंग फोडणी मुळ्याच्या रायत्यामध्ये घाला त्यावर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि सगळं एकदा व्यवस्थित हलवून घ्या. 

रात्री लवकर झोप येत नाही, लगेच झोपमोड होते? ५ गोष्टी करा, अंथरुणावर पडताच शांत झोपाल

जेव्हा तुम्ही रायतं पानात वाढून घेणार असाल त्याच्या अगदी आधी त्यात मीठ घाला. कारण रायत्यामध्ये मीठ घातलं की लगेच त्याला पाणी सुटतं. या रेसिपीने केलेलं रायतं एकदा जेवणात तोंडी लावून पाहाच..

 

टॅग्स :हिवाळ्यातला आहारअन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.भाज्याफळे