Lokmat Sakhi >Food > १ कप मूगडाळीचे करा चविष्ट आप्पे, सोडा न घालताही आप्पे फुगतील टम्म

१ कप मूगडाळीचे करा चविष्ट आप्पे, सोडा न घालताही आप्पे फुगतील टम्म

Moong Dal Appe-South Indian style रोज नाश्त्याला काय करायचं या प्रश्नाचं पौष्टिक उत्तर, मुगडाळ आप्पे-सोपी रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2023 12:02 PM2023-07-15T12:02:45+5:302023-07-15T17:16:14+5:30

Moong Dal Appe-South Indian style रोज नाश्त्याला काय करायचं या प्रश्नाचं पौष्टिक उत्तर, मुगडाळ आप्पे-सोपी रेसिपी

Moong Dal Appe-South Indian style | १ कप मूगडाळीचे करा चविष्ट आप्पे, सोडा न घालताही आप्पे फुगतील टम्म

१ कप मूगडाळीचे करा चविष्ट आप्पे, सोडा न घालताही आप्पे फुगतील टम्म

नाश्ता म्हटलं की पोहे, उपमा, रवा, इडली, डोसा, मेदू वडा हे पदार्थ केले जातात. काहींकडे नाश्त्याला चपाती - भाजी केली जाते. परंतु, रोज रोज तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. घरातील सदस्यांना देखील काहीतरी चमचमीत, चविष्ट पदार्थ खाण्याची इच्छा होते. जर आपल्याला देखील विकेंडला काहीतरी हटके खायचं असेल तर, मूग डाळीचे चविष्ट आणि हेल्दी आप्पे ही रेसिपी ट्राय करून पाहा.

मूग डाळीचे आप्पे चवीला रुचकर खमंग लागतात. मूग डाळीमध्ये लोह, पोटॅशियम, आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे ही हेल्दी रेसिपी आपण नाश्त्यासाठी किंवा मुलांना टिफिनसाठी देखील देऊ शकता. चला तर मग या झटपट चविष्ट रेसिपीची कृती पाहूयात(Moong Dal Appe-South Indian style).

मुग डाळीचे आप्पे करण्यासाठी लागणारं साहित्य

एक कप मूग डाळ

मीठ

जीरा

हळद

१ कप गव्हाचं पीठ - अर्धा कप रवा, १० मिनिटांत करा गव्हाचा कुरकुरीत डोसा

हिरवी मिरची - आलं पेस्ट

टॉमेटो

गाजर

पालक

तेल

कृती

सर्वप्रथम, एक कप मूग डाळ ३ तासांसाठी पाण्यात भिजत ठेवा. भिजवलेली मूग डाळ मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या, व त्याची पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात चवीनुसार मीठ, अर्धा चमचा जिरं, चिमुटभर हळद, हिरवी मिरची - आलं पेस्ट, बारीक चिरलेला टॉमेटो, बारीक चिरलेला गाजर, व बारीक चिरलेली पालक घालून एकजीव करा.

फक्त एक कप मूग डाळीचा करा खमंग - चविष्ट, स्पंजी ढोकळा, १५ मिनिटात डिश रेडी

बॅटर रेडी झाल्यानंतर आप्पेपात्रात तेल ग्रीस करून गरम करण्यासाठी ठेवा. आप्पेपात्राच्या वाट्यांमध्ये एक - एक टेबलस्पून बॅटर घालून झाकण ठेवा. गॅस मध्यम आचेवर ठेवा. जेणेकरून आप्पे आतून मऊ होतील. ५ मिनिटानंतर झाकाण काढा. व दुसरी बाजू देखील छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या. अशा प्रकारे मऊ, खमंग - पौष्टीक आप्पे खाण्यासाठी रेडी. आपण हे आप्पे चटणी, किंवा केचअपसोबत खाऊ शकता.

Web Title: Moong Dal Appe-South Indian style

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.