Join us  

विकतसारखी गोलगोल, क्रिस्पी मुग भजी घरीच करा; ना सोडा, ना कॉर्नफ्लोर, एकदम हेल्दी रेसेपी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 2:03 PM

Moong Dal Bhaji Recipe : मुगाच्या डाळीचे डोसे किंवा भजी खाल्यास तुम्हाला पोषक घटकही मिळतील. सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळी चहाबरोबर खाण्यासाठी मूग भजी हा उत्तम पर्याय आहे.

नाश्त्याला काही नवीन खावंस वाटलं की आपण नेहमीच बाहेरचे तेलकट,  स्पायसी पदार्थ खातो. (Moong Dal Bhaji Recipe) आठवडाभर तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला की विकेंडला नवीन काहीतरी खावंसं वाटतं अशावेळी बाहेरून काही आणण्यापेक्षा घरच्याघरी कमी साहित्यात तयार होणाऱ्या पदार्थांचा तुम्ही आहारात समावेश करू शकता. घरच्याघरी हॉटेलस्टाईल मूग भजी करण्याची सोपी, रेसेपी पाहूया. मुगाची डाळ इतर कोणत्याही डाळींपेक्षा पचायला हलकी आणि पौष्टीक असते. (How to make moong bhaji)

मुगाच्या डाळीचे डोसे किंवा भजी खाल्यास तुम्हाला पोषक घटकही मिळतील. सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळी चहाबरोबर खाण्यासाठी मूग भजी हा उत्तम पर्याय आहे. याशिवाय जेवतानाही तुम्ही मूग भजीच्या मिश्रणापासून पॅटिस बनव शकता. पाहूया मूग डाळीची भजी बनवण्याची सोपी रेसेपी (Moong Bhaji Recipe)

मूग डाळीची भजी कशी बनवायची?

साहित्य

1/2 कप मूग डाळ

२ हिरव्या मिरच्या चिरलेल्या

२-३ लसूण पाकळ्या

१/२ टीस्पून आले बारीक चिरून

1 चिमूटभर हिंग

चवीनुसार मीठ

आवश्यकतेनुसार तळण्यासाठी तेल

१) मूग डाळ धुवून ४ तास भिजत ठेवा.

२) नंतर भिजवलेली मूग डाळ, हिरवी मिरची, लसूण, आले मिक्सरच्या भांड्यात बारीक वाटून घ्या.

३) एका भांड्यात डाळीची पेस्ट काढून त्यात चवीनुसार मीठ आणि हिंग घालून मिक्स करा.

४) कढईत तेल गरम करून त्यात डाळीच्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे बनवून मध्यम आचेवर सोनेरी होईपर्यंत तळून घ्या आणि नंतर तेलातून काढून टिश्यू पेपरवर ठेवा म्हणजे जास्तीचे तेल बाहेर पडेल.

बिना कांदा-लसणाचं चवदार वाटणं; एकदाच करा; आठवडाभर कोणत्याही भाजीसाठी वापरा

५) एका प्लेटमध्ये काढून तुमच्या आवडत्या चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न