नाश्त्याला पोहे, उपमाऐवजी काही वेगळा पदार्थ असेल तर घरातील सगळेचजण आवडीन खातात. नाश्त्यासाठी बाहेरचं काहीही आणलं ते कोणत्या तेलात तळले जाते याची कल्पना नसते. सतत बाहेरचं खाल्ल्यामुळे आरोग्यालाही धोका पोहोचू शकतो. (How to make moong dal chilla at home) त्यापेक्षा घरच्याघरी सोप्या पद्धतीन पौष्टीक पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता.
मूग डाळ डोसा चवीला अप्रतिम असतो. (How to make moong dal cheela at home) चिला तुम्हाला फक्त वाटीभर मूग डाळ लागेल. घरच्याघरी उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर करून तुम्ही चविष्ट मुग डाळ डोसा बनवू शकता. (Moong Dal Chilla Recipe)
साहित्य
भिजवलेली मूगाची डाळ - १ ते दीड वाटी
जीरं- १ टिस्पून
मीठ- १ टिस्पून
हळद- दीड टिस्पून
हिंग - २ चिमूट
आलं- २ इंच
कढीपत्ता- २ ते ३
हिरव्या मिरच्या - २ ते ३
कांदे- १ ते २
पाणी- १ कप
तेल - गरजेनुसार
कृती
१) मूगाच्या डाळीचा डोसा बनवण्यासाठी सगळ्यात आधी पिवळी मुगाची डाळ रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. किंवा डोसा बनवण्याच्या २ तास आधी डाळ भाज्यात भिजवा. त्यानंतर डाळ पाण्यातून बाहेर काढून एका मोठ्या गाळणीत ठेवा किंवा पाणी व्यवस्थित काढून तुम्ही ताटातही ठेवू शकता.
विकतसारखे खारे शेंगदाणे घरीच करा झटपट, गरमागरम खारे शेंगदाणे खाण्याची मजाच काही और
२) जीरं, हळद, मीठ, कांदा, कढीपत्ता, लसूण, मिरची घालून बारीक पेस्ट तयार करा. त्यात गरजेनुसार पाणी घालून पातळ पेस्ट तयार करा. ही पेस्ट एका भांड्यात काढून घ्या.
३) त्यानंतर एका नॉनस्टीक पॅनला तेल लावून घ्या. तेल गरम झाल्यानंतर त्यात चमच्याच्या साहाय्याने डोश्याचं पीठ घाला आणि गोलाकार फिरवा. डोसा एका बाजूने व्यवस्थित झाल्यानंतर तो दुसऱ्या बाजूला फिरवा.
साबुदाणा वडे करताना पीठात १ पदार्थ घाला, वडे फुटणार नाहीत -तेलही पिणार नाहीत
४) त्यावर पुदिना, कोथिंबीरची हिरवी चटणी घाला. त्यानंतर कोथिंबीर आणि पनीरचं मिश्रण घाला. पनीरचं मिश्रण तव्यावर घातल्यानंतर डोसा फोल्ड करा. तयार आहे प्रोटीन्सयुक्त मूग डाळ चिला.
५) पनीरचं मिश्रण तयार करण्यासाठी पनीरचे तुकडे मॅश करून घ्या. एका कढईत तेल गरम करून त्यार जीर, मोहोरी आणि मिरचीची फोडणी द्या. त्यात पनीर, हळद, मीठ घालून परतून घ्या. एक वाफ काढल्यानंतर गॅस बंद करा आणि ते मिश्रण थंड होऊ द्या.