निरोगी (Health Care) राहण्यासाठी आहारात पौष्टीक पदार्थांचा समावेश करणं अत्यंत गरजेचं आहे. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण यासह रात्रीचं डिनर हे पौष्टीक पदार्थांनी करायला हवे. सकाळचा नाश्ता हेल्दी पदार्थांनी केल्याने दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते (Cooking Tips and Tricks). नाश्त्याला आपण पोहे, उपमा, साऊथ इंडियन पदार्थ यासह ढोकळा आवडीने खातो.
पिवळाधमक ढोकळा आपण खाल्लंच असेल. पण आपण कधी हिरव्या मुगाचा ढोकळा खाऊन पाहिलं आहे का? हिरव्या मुगाची उसळ, आमटी, डोसा तर आपण करतोच (Dhokla Easy Recipe). पण एकदा ढोकळा करून पाहा. यात हिरवे मूग, पालक आणि तांदुळाचा वापर होतो. त्यात प्रोटीन आणि आयर्नचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे हा हिरवा ढोकळा आरोग्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरतो(Moong Dal Dhokla Recipe | Healthy Snack Recipe).
हिरव्या मुगाचा ढोकळा करण्यासाठी लागणारं साहित्य (Green Dhokla Recipe in Marathi)
हिरवे मूग
तांदूळ
हिरवी मिरची
आल्याचा तुकडा
कोथिंबीर
पालक
सैंधव मीठ
फ्रिजमधून दुर्गंधी येते-झुरळंही फिरतात? डब्यात 'ही' पांढरी पावडर घालून ठेवा; फ्रिज राहील कायम स्वच्छ
इनो
तेल
जिरं
मोहरी
कडीपत्ता
किसलेलं खोबरं
कृती
सर्वप्रथम, एका भांड्यात एक कप हिरवे मूग घ्या, आणि दुसऱ्या बाऊलमध्ये तांदूळ घ्या. त्यात पाणी घालून मूग आणि तांदूळ धुवून घ्या. त्यात पुन्हा कपभर पाणी घालून ५ ते ६ तासांसाठी भिजत ठेवा. नंतर मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले तांदूळ, हिरवे मूग, हिरवी मिरची, आल्याचा तुकडा, कोथिंबीर आणि वाफवून घेतलेली पालकाची पानं घालून पेस्ट तयार करा. गुळगुळीत पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्या.
जेवणानंतर की जेवणाआधी? ताक नेमके कधी प्यावे? ताक प्यायल्याने वजन तर घटतेच; आणि...
पेस्टमध्ये एक चमचा सैंधव मीठ, एक चमचा इनो, २ चमचे पाणी घालून साहित्य मिक्स करा. एका भांड्याला ब्रशने तेल लावून घ्या. त्यात पेस्ट ओतून पसरवा. इडली स्टीमरमध्ये पाणी घालून गरम करण्यासाठी ठेवा. त्यात भांडं ठेवा, व त्यावर झाकण ठेऊन ढोकळा वाफेवर शिजवून घ्या. १५ मिनिटानंतर ढोकळा तयार झाला आहे की नाही, हे चेक करा. तयार ढोकळा एका प्लेटमध्ये काढून घ्या.
आता फोडणीच्या पळीत एक चमचा तेल घाला. त्यात एक चमचा मोहरी, जिरं, कडीपत्ता, हिरवी मिरची घालून मिक्स करा. तयार फोडणी ढोकळ्यावर ओता, व शेवटी कोथिंबीर आणि किसलेलं खोबरं भुरभुरून डिश सर्व्ह करा.