बहुतेक सगळ्यांनाच नाश्त्यात इडली खायला आवडते. इडली सोबत जर सांबार आणि चटणी असेल तर इडली खायला अधिकच चविष्ट लागते. इडली तयार करायला सोपी झटपट तयार होणारी आणि पचायला हलकी असल्याने सकाळच्या नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. साधारणतः इडली (Protein Idli) तयार करण्यासाठी आपण उडीद डाळ आणि तांदूळ भिजवून त्याचे पीठ आंबवून मग त्या पिठाची इडली करतो. परंतु नेहमी त्याच पद्धतीने तयार केली जाणारी इडली खाऊन कंटाळा येतो(Moong Dal Idli Breakfast Recipe).
याचबरोबर डाळ - तांदूळ भिजवून इडली तयार करायची म्हटलं की खूप मोठा घाट घालावा लागतो. यासाठी काहीतरी वेगळं म्हणून डाळ तांदूळ न वापरता आपण पौष्टिक पिवळ्या मूग डाळीचा वापर करुन इडली (Moong dal idli - Instant without rice) तयार करु शकतो. मूगडाळीची इडली हा इडलीचा नवा प्रकार ट्राय करून पाहा. भरपूर प्रोटीन देणारी ही इडली वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांनाही अतिशय उपयुक्त ठरणारी आहे. मूगडाळीची इडली देखील आपल्या नेहमीच्या इडली प्रमाणेच कापसासारखी सॉफ्ट, मऊसूत तयार होतील. याचबरोबर त्यातील पौष्टिक घटक आरोग्यासाठी फायदेशीर ठरतील. मूग डाळीची इडली तयार करण्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती पाहूयात(How To Make a Moong Dal Idli At Home).
साहित्य :-
१. पिवळी मूग डाळ - १ कप
२. रवा - १/४ कप
३. दही - १/४ कप
४. आलं - आल्याचे २ लहान तुकडे
५. हिरव्या मिरच्या - २ (बारीक तुकडे करुन घेतलेले)
६. मीठ - चवीनुसार
७. पाणी - गरजेनुसार
८. इनो - १/२ टेबलस्पून
९. गाजर - १/२ कप (बारीक किसून घेतलेले)
१०. कोथिंबीर - २ टेबलस्पून (बारीक चिरुन घेतलेली)
फक्त चहाच नाही थंडी प्या ‘ही’ ६ पेयं, कुडकुडणाऱ्या थंडीतही आजार राहतील कायम दूर...
महागडे ड्रायफ्रुट्स खराब होऊ नयेत म्हणून करा ८ गोष्टी, कुबट वास येणार नाही...
कृती :-
१. सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये पिवळी मूग डाळ घेऊन ती ३ ते ४ वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी. त्यानंतर त्यात थोडे पाणी ओतून १० ते १५ मिनिटे पाण्यांत भिजवून घ्यावी.
२. दुसऱ्या बाऊलमध्ये रवा आणि दही एकत्रित मिक्स करुन त्याची मध्यम कंन्सिस्टंसीची पेस्ट तयार करुन घ्यावी.
३. आता भिजवत ठेवलेल्या मूग डाळीतील पाणी काढून त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि आल्याचे तुकडे घालून हे सगळे जिन्नस मिक्सरच्या भांड्यात घालून एकत्रित वाटून घ्यावे. मध्यम कंन्सिस्टंसीची पेस्ट तयार करुन घ्यावी.
साजूक तुपाला वास लागू नये म्हणून ७ टिप्स, तूप महिनोंमहिने राहील सुगंधी आणि रवाळ...
४. आता मिक्सरमधून वाटून घेतलेले मूग डाळीचे बॅटर एका बाऊलमध्ये काढून त्यात दही आणि रव्याची तयार केलेली पेस्ट मिक्स करावी. त्यानंतर या तयार इडलीच्या पिठात आपण आपल्या आवडीप्रमाणे भाज्या देखील घालू शकतो. यात चवीनुसार मीठ, किसून घेतलेले गाजर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.
५. आता हे सगळे बॅटर चमच्याने हलवून एकजीव करून घ्यावे. सगळ्यात शेवटी यात थोडेसे इनो घालावे.
६. तयार इडली बॅटर तेलाने ग्रीस करून घेतलेल्या इडली पात्रात ओतावे आणि इडल्या नेहमीप्रमाणे वाफेवर वाफवून घ्याव्यात.
अशाप्रकारे मुगाच्या डाळीचा वापर करून झटपट होणाऱ्या प्रोटीनरीच इडल्या खाण्यासाठी तयार आहेत. ही इडली आपण सांबार आणि चटणी सोबत देखील खाण्यासाठी सर्व्ह करु शकता.