Join us  

मुगाच्या डाळीची सुपर स्पाँजी इडली, भरपूर प्रोटीन देणारा चवदार नाश्ता- बघा सोपी रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2024 1:12 PM

Moong Dal Idli: तांदूळ आणि उडीदाची डाळ घालून केलेली नेहमीची इडली खाण्याचा कंटाळा आला असेल तर हा एक इडलीचा नवा प्रकार करून पाहा.

ठळक मुद्देही इडली चटणी किंवा सांबार सोबत खाऊ शकता. किंवा नुसती तशीच खाल्ली तरी चालेल. आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर यामुळे त्या इडलीला खूप छान येते.

इडली हा बहुतांश लोकांचा अतिशय आवडीचा पदार्थ मग तुम्ही ती सांबार सोबत खा किंवा चटणी सोबत खा. कशीही ती चवदारच लागते. शिवाय पचायला हलकी असते. पण बऱ्याचदा असं होतं की उडीद डाळ आणि तांदूळ यांची नेहमीच्या पद्धतीने केलेली इडली खाऊन कंटाळा येतो. म्हणून आता इडलीचा हा नवा प्रकार ट्राय करून पाहा (how to make moong dal idli?). ही इडली करण्यासाठी आपण मुगाची डाळ वापरणार आहोत. भरपूर प्रोटीन देणारी ही इडली वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांनाही अतिशय उपयुक्त ठरणारी आहे. (protein rich breakfast)

 

मुगाची इडली करण्याची रेसिपी 

साहित्य

२ वाट्या मुगाची डाळ 

पाव वाटी तांदूळ

उन्हामुळे सनबर्नचा त्रास? करा 'हा' जादुई उपाय, त्वचेला मिळेल थंडावा- टॅनिंग जाऊन उजळेल त्वचा

पाव वाटी उडीद डाळ 

२ टेबल स्पून रवा

१ टेबल स्पून आलं, लसूण, मिरची पेस्ट 

चवीनुसार मीठ 

२ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर 

अर्ध्या लिंबाचा रस

 

कृती

रात्री झोपण्यापूर्वी मुगाची डाळ, तांदूळ आणि उडदाची डाळ दोन- तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या आणि त्यानंतर ती भिजत टाका. हे मिश्रण सहा ते सात तास चांगले भिजणे गरजेचे आहे. 

यानंतर सकाळी भिजलेली मूग डाळ, तांदूळ आणि उडीद डाळ मिक्सरच्या भांड्यात टाका त्यामध्येच आलं, लसूण, मिरची पेस्ट आणि कोथिंबीर टाका आणि अर्धे लिंबू पिळा.

उन्हाळ्यात पालींचा सुळसुळाट- बारीक पिल्लं घरात दिसतात? बघा पाली घरातून गायब करण्याचा १ उपाय

हे मिश्रण मिक्सरमधून चांगले बारीक करून घ्या. त्यानंतर एका भांड्यात काढा. त्यात रवा आणि चवीनुसार मीठ घालून सगळे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. दहा मिनिटे ते तसेच झाकून ठेवा. 

यानंतर आता तुम्ही नेहमीच्या पद्धतीने जशी इडली करता तशी इडली पात्राला तेल लावून इडल्या करा. 

ही इडली चटणी किंवा सांबार सोबत खाऊ शकता. किंवा नुसती तशीच खाल्ली तरी चालेल. आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर यामुळे त्या इडलीला खूप छान येते.

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृती