इडली (Idli) हा एक असा पदार्थ आहे, जो नाश्ता, लंच किंवा डिनरला खाता येऊ शकते (Cooking Tips). त्यामुळे घरोघरी इडली केली जाते (Kitchen Tips). पण इडली प्रत्येकाला जमलेच असे नाही. इडली करताना साहित्याचे प्रमाण चुकलं अथवा बॅटर व्यवस्थित फरमेण्ट झालं नसेल तर, इडली दडस किंवा फुगत नाही. ज्यामुळे इडली खाण्याची इच्छाच होत नाही. इडलीचा बेत फसला की, सर्वांचाच हिरमोड होतो.
इडली खायला पौष्टीक पण, जर आपल्याला झटपट इडली करायची असेल, तर या रेसिपीला नक्की फॉलो करा. तांदूळ आणि रव्याची इडली खाऊन कंटाळा आला असेल तर, फक्त उडीद डाळ आणि मुगाची इडली करा. अगदी १५ मिनिटांत फ्लफी इडल्या तयार होतील(Moong Dal Idli Recipe | High Protein urad-moong idli).
युट्यूबर आशिष चंचलानीने घटवलं ४० किलो वजन, तो सांगतोय १ सिक्रेट-कसं कमी झालं वजन
झटपट इडल्या करण्यासाठी लागणारं साहित्य
उडीद डाळ
मूग डाळ
साबुदाणे
मीठ
कृती
सर्वात आधी एका बाऊलमध्ये उडीद आणि दुसऱ्या बाऊलमध्ये मूग डाळ घ्या. त्यात पाणी घालून उडीद आणि मूग डाळ स्वच्छ धुवून घ्या. नंतर तिसऱ्या छोट्या वाटीमध्ये ४ - ५ चमचे साबुदाणे घ्या, त्यातही पाणी घालून धुवून घ्या. नंतर त्यात घेतलेल्या डाळीच्या प्रमाणात दुप्पट पाणी घाला. आणि भिजत ठेवा.
ए.आर. रहमान यांचा २९ वर्षे जुना संसार मोडला, आणि चर्चा आहे इमोशनल स्ट्रेनची! ते म्हणजे नेमकं काय..
५ - ६ तास डाळी भिजल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून वाटून घ्या. तयार गुळगुळीत पेस्ट एका बाऊलमध्ये काढा. त्यात चवीनुसार मीठ घालून हाताने मिक्स करा. ६ - ८ तासांसाठी फरमेण्ट करण्यासाठी ठेवा.
आता इडलीचं भांडं घ्या. त्यात पाणी घालून गरम करण्यासाठी ठेवा. इडली पात्र घ्या. त्याला ब्रशने तेल लावा. त्यात चमचाभर बॅटर ओता, आणि पात्र स्टीमरमध्ये ठेवा. १० मिनिटांनंतर इडल्या वाफेवर शिजल्या आहेत की नाही हे चेक करा. अशा प्रकारे फ्लफी पौष्टीक इडली खाण्यासाठी रेडी.