Join us  

१ वाटी मूग डाळीची करा मऊ-लुसलुशीत इडली; १० मिनिटांत बनेल परफेक्ट नाश्ता-घ्या सोपी रेसिपी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 10:55 PM

Moong Dal Idli Recipe : स्वादीष्ट प्रोटीन रिच नाश्त्याचा आनंद घेण्यासाठी मऊ-लुसलुशित इडल्या कशा करायच्या ते पाहूया.

साऊथ इंडियन (South Indian) खाण्याचे शौकिन असलेले लोक नाश्त्याला इडली (Idli) खाणं पसंत करतात. डाळ, तांदूळाची इडली तुम्ही अनेकदा खाल्ली असेल तर पण तुम्ही कधी प्रोटीन इडली खाल्ली आहे का? ही प्रोटीन युक्त इडली करायला खूपच सोपी असते (Cooking Hacks). मूग डाळ प्रोटीनचा एक चांगला स्त्रोत आहे. मुगाची डाळ भिजवून तुम्ही १० मिनिटांत मऊ लुसलुशित इडल्या बनवू शकता. स्वादीष्ट प्रोटीन रिच नाश्त्याचा आनंद घेण्यासाठी मऊ-लुसलुशित इडल्या कशा करायच्या ते पाहूया.  ही पौष्टीक इडली बनवण्यासाठी कमीत कमी साहित्य लागते. 

प्रोटीन इडली बनवण्यासाठी लागणारं साहित्य

प्रोटीन इडली बनवण्यासाठी  अडीच कप मूग डाळ, आलं- अर्धा इंच, २ ते ३ हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा हळद, २ चमचे दही, १ इनोचं पॅकेट, १ चमचा तेल, १ चमचा मोहोरी, १ चुटकी हिंग, अर्धा चमचा उडीदाची डाळ, १० ते १२ कढीपत्ते, चवीनुसार मीठ, हिरवी चटणी आणि सजावटीसाठी बीट घ्या. 

प्रोटीन इडली बनवण्यासाठी सगळ्यात आधी मूग डाळ ५ ते ६ तासांसाठी पाण्यात भिजू द्या. मूग डाळ रात्रभर पाण्यात भिजवायला ठेवू शकता. भिजवलेली मूग डाळ धुवून मिक्सर ग्राईंडरमध्ये घाला. नंतर यात हळद पावडर, हिरवी मिरची, आलं आणि मीठ घालून वाटून घ्या. ही पेस्ट जास्त पातळ नसेल याची काळजी घ्या नंतर मूग डाळीची पेस्ट बाऊलमध्ये काढून घ्या. नंतर यात दही घाला. 

खाण्यापिण्याबात WHO नं दिल्या गाईडलाईन्स; तब्येत चांगली ठेवायची तर काय खायचं, काय टाळायचं- पाहा

फोडणी देण्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करा. नंतर पॅनमध्ये मोहोरी, हिंग, उडीदाची डाळ आणि कढीपत्ता घालून फोडणी तयार करून घ्या. नंतर मूगाच्या डाळीची पेस्ट मिक्स करून घाला. शेवटी यात कोथिंबीर घाला. नंतर इनो किंवा पाणी घालून व्यवस्थित मिसळून घ्या. नंतर मूग डाळीची पेस्ट मिक्स करा शेवटी यात कोथिंबीर घाला. नंतर इनो आणि पाणी घालून व्यवस्थित मिसळून घ्या तयार आहे इडलीचे बॅटर.

अंगात कॅल्शियम कमी-हाडं कमजोर आहेत? २० रूपयात ५ पदार्थ खा, कॅल्शियम कधीच कमी पडणार नाही

इडली मेकरच्या साच्याला तेल लावा. नंतर गरजेनुसार बीट, गाजर किसून यात घाला. इडली मेकरमध्ये पीठ घालून इडल्या वाफवून  घ्या. ८  ते १० मिनिटांत इडल्या तयार होतील.  या इडल्या तुम्ही नारळाची चटणी किंवा हिरव्या चटणीबरोबर खाऊ शकता. 

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स