संध्याकाळी किंवा मधल्यावेळेत भूक लागल्यानंतर काहीतरी खमंग, कुरकुरीत खाण्याची इच्छा सर्वांचीच होते. खाकरा, चिवडा, बाकरवडी असे पदार्थ लोक भूक लागल्यानंतर खातात. बाहेरून आणलेल्या पॅकेज पदार्थांमध्ये कोणतं तेल वापरलं जातं. ते तेल तब्येतीसाठी सुरक्षित आहे का याची कल्पना नसते. (Crispy Moong Dal Namkeen Recipe)
चहाबरोबर खाण्यासाठी किंवा नाश्त्याला खाण्यासाठी तुम्ही खमंग मुगाची डाळ बनवू शकता. पारले, हल्दीराम अशा अनेक ब्रॅण्ड्समध्ये मुगडाळीचे लहान लहान,मोठे स्नॅक्स पाकीट्स आपल्याला उपलब्ध होतात. घरी मुगडाळ बनवण्याची सोपी रेसेपी पाहूया. (How to Make Moongdal)
साहित्य
मूग डाळ - 1 कप (200 ग्रॅम)
बेकिंग सोडा - 1 चिमूटभर
मीठ - ½ टीस्पून
हिरवी मिरची - २ बारीक चिरून
लिंबू - ½
हिरवी धणे
कृती
१) नमकीन, कुरकुरीत मूग डाळ करण्यासाठी 1 कप मूग डाळीमध्ये चिमूटभर बेकिंग सोडा टाका आणि 4 तास पाण्यात भिजत ठेवा. ४ तासांनंतर, डाळ पाण्यातून काढून, नीट धुवा आणि अर्धा तास सुकण्यासाठी कपड्यावर ठेवा.
२) अर्ध्या तासानंतर डाळ कापडाने पुसून घ्या. आता एका पॅनमध्ये मोठ्या आचेवर तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर डाळीचा एक दाणा तेलात टाका आणि तेल गरम आहे की नाही ते पहा. डाळी तळण्यासाठी आणखी गरम तेलाची गरज असल्यास गरम करून घ्या.
३) मूग डाळ कढईत टाका आणि गाळणीच्या आत काही डाळी तळण्यासाठी ठेवा, आता डाळ ढवळून घ्या आणि मोठ्या आचेवर तळून घ्या. डाळ नंतर कुरकुरीत आहे की नाही हे तपासण्यासाठी दाबून पाहा.
४) डाळ तळल्यानंतर, कागदावर भांड्यात ठेवा जेणेकरून अतिरिक्त तेल कागदाद्वारे शोषले जाईल. उरलेल्या डाळीही तशाच तळून घ्या. एका वेळी डाळ व्यवस्थित तळली जाण्यासाठी 2 ते 3 मिनिटे लागतात. सर्व डाळ तळून झाल्यावर त्यात अर्धा टीस्पून मीठ घालून मिक्स करा. एकदा डाळ थंड झाली की तुम्ही ती हवाबंद डब्यात 1 महिन्यापर्यंत ठेवू शकता.
५) जर तुम्हाला ही डाळ चटपटीत बनवायची असेल तर त्यात थोडी हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अर्धा लिंबाचा रस घालून मिक्स करा. मसालेदार, कुरकुरीत मूग डाळ तयार आहे.