Join us  

नाश्त्याला करा कमी तेल पिणारी कुरकुरीत मूग भजी; तब्येतीला पौष्टीक, खमंग,सोपी रेसिपी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2023 2:44 PM

Moong Dal Pakoda Recipe :  मुगाची डाळ ही सगळ्या डाळींमध्ये पचायला हलकी असते.

शरीराला प्रोटिन्स मिळण्यासाठी डाळींचे सेवन उत्तम मानलं जातं. डाळींचा आहारात समावेश केल्यानं शरीराला पोषक घटक मिळतात इतकंच नाही तर डाळींनी परीपूर्ण पदार्थ  खाल्ल्यास बराचवेळ भूक लागत नाही. पोट  भरल्यासारखं वाटतं.  मुगाची डाळ ही सगळ्या डाळींमध्ये पचायला हलकी असते. (How to make Moong Dal Pakoda)

मुगाच्या डाळीचे वडे, डोसा, खिचडी अनेक घरामध्ये खाल्ले जातात. चण्याची डाळ वापरून केलेल्या भजी, वडे खाल्ल्यानंतर गॅस, पोट फुगणं असे पोटाचे त्रास उद्भवतात.  याऊलट जर तुम्ही मुगाच्या डाळीचे पदार्थ खाल्ले तर पोटाचे त्रास टाळतात येतात. यात फायबर्स जास्त प्रमाणात असतात. मुगाच्या डाळीच्या कुरकुरीत खमंग भजी बनवण्याची रेसेपी पाहूया. (Moong Dal Pakoda Recipe)

मूगाच्या डाळीची भजी कशी बनवायची

१) मूगाच्या डाळीची भजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी मुगाची डाळ पाण्यात  रात्रभर भिजवून ठेवा.

२)  सकाळी पाणी उपसून डाळीत मीठ मसाले, हळद, जीर, कोथिंबीर, मिरची घालून दळून घ्या.

३) दळलेलं मिश्रण जास्त पातळ नसेल याची काळजी घ्या.  जाडसर  दळल्यानंतर हे मिश्रण एका भांड्यात काढा

४) त्यानंतर दळलेल्या मिश्रणाचे लहान लहान गोळे करून भजी लालसर होईपर्यंत तळून घ्या.

५) तयार आहेत कुरकुरीत, खमंग मूग भजी.  सॉस किंवा हिरव्या मिरचीच्या चटणीसोबत तुम्ही या भजी खाऊ शकता. 

टॅग्स :किचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.अन्न