पावसाळा म्हटलं तर, अनेकांना भजी आठवते. भजी शिवाय पावसाळा अपूर्ण आहे. बाहेर रिमझिम पडणारा पाऊस, थंड गार वारा, त्यात जर हातात कोणी गरमागरम भजी आणून दिली, तर वाह. माहोल तयार होईल. पावसाळा आणि कुरकुरीत भजी हे समीकरण फार जुनं आहे. आणि अनेक लोकं या पावसाळ्यात भजी हमखास खातात.
भजी अनेक प्रकारची केली जाते. कांदा भजी, बटाटा भजी, पालक भजी, पण या सगळ्यात मूग भजीचा खवय्यावर्ग फार मोठा आहे. मूग भजी आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. यात प्रोटीन्सचे प्रमाण जास्त असल्यामुळे पचायलाही हलकी असते. यासह त्यात फायबर्सही जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे या भजीतून चवही व आरोग्याला अनेक पौष्टीक घटकही मिळतात(Moong Dal Pakoda Recipe | No Besan Pakoda | Serve with Green Chutney | Snacks For Rainy Evening).
मुगाच्या डाळीची कुरकुरीत भजी करण्यासाठी लागणारं साहित्य
मूग डाळ
बारीक चिरलेला कांदा
आलं
लसूण
कोथिंबीर
मीठ
चपात्या कडक-वातड होऊ नयेत म्हणून ४ टिप्स, सकाळी केलेल्या चपात्या रात्रीपर्यंत राहतील मऊ
हळद
हिरवी मिरची
कृती
सर्वप्रथम, ५ ते ७ तासांसाठी मूग डाळ पाण्यात भिजत घालून ठेवा. मूग डाळ भिजल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्याची पेस्ट तयार करा. मूग डाळीची ही पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात बारीक चिरलेला ४ ते ५ कांदा, बारीक चिरलेला आलं, बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, चिमुटभर हळद, व बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून मिश्रण एकजीव करा.
शिळ्या चपातीचं काय करावं सुचत नाही? १० मिनिटात करा कुरकुरीत डोसा, चव भन्नाट - टिफिनसाठी बेस्ट ऑप्शन
दुसरीकडे कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात मूग डाळीच्या मिश्रणाचे छोटे - छोटे गोळे तयार करून गरम तेलात सोडा. व भजीला सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. अशा प्रकारे मूग डाळीची कुरकुरीत भजी खाण्यासाठी रेडी.