Lokmat Sakhi >Food > थंडीमध्ये प्यायलाच हवं मुगाच्या डाळीचं हेल्दी सूप.. पाहा जुही परमारने शेअर केलेली सोपी रेसिपी

थंडीमध्ये प्यायलाच हवं मुगाच्या डाळीचं हेल्दी सूप.. पाहा जुही परमारने शेअर केलेली सोपी रेसिपी

How to make Moong dal soup: प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असणाऱ्या मुगाच्या डाळीचं टेस्टी आणि हेल्दी सूप कसं करायचं, याची खास रेसिपी अभिनेत्री जुही परमार (Juhi Parmar) हिने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2022 05:07 PM2022-12-20T17:07:34+5:302022-12-20T17:08:13+5:30

How to make Moong dal soup: प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असणाऱ्या मुगाच्या डाळीचं टेस्टी आणि हेल्दी सूप कसं करायचं, याची खास रेसिपी अभिनेत्री जुही परमार (Juhi Parmar) हिने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

Moong dal soup recipe by actress Juhi Parmar. Simple and easy recipe of Moong dal soup  | थंडीमध्ये प्यायलाच हवं मुगाच्या डाळीचं हेल्दी सूप.. पाहा जुही परमारने शेअर केलेली सोपी रेसिपी

थंडीमध्ये प्यायलाच हवं मुगाच्या डाळीचं हेल्दी सूप.. पाहा जुही परमारने शेअर केलेली सोपी रेसिपी

Highlightsटोमॅटो, पालक, लेमन कोरिएंडर, स्वीटकॉर्न असे वेगवेगळे सूप घरी ट्राय करून झाले असतील तर आता हे एक मुगाच्या डाळीचं सूप करून बघा.

थंडीच्या दिवसांत रात्रीच्या वेळी हवेतला गारवा वाढला की जेवणात एखादं गरमागरम सूप असावं असं हमखास वाटतं. एकवेळ जेवण जरा कमी असेल तरी चालेल, पण सूप मात्र असायलाच हवं. ते सूप जर होममेड असेल तर त्याची पौष्टिकता आणखी वाढणार यात वाद नाही. म्हणूनच टोमॅटो, पालक, लेमन कोरिएंडर, स्वीटकॉर्न असे वेगवेगळे सूप घरी ट्राय करून झाले असतील तर आता हे एक मुगाच्या डाळीचं सूप (Moong dal soup) करून बघा. त्यासाठी बघा अभिनेत्री जुही परमार (Moong dal soup recipe by actress Juhi Parmar) हिने शेअर केलेली ही खास आणि अगदी सोपी रेसिपी.

कसं करायचं मुगाच्या डाळीचं सूप?
साहित्य

१ कप भिजवलेली मुगाची डाळ

१ लहान आकाराचा कांदा

१ मध्यम आकाराचा टोमॅटो

मटार लच्छा पराठा! चवीला एकदम भारी, थंडीत करून बघाच हा गरमागरम बेत, पाहा रेसिपी

१ मध्यम आकाराचं गाजर

४ ते ५ लसूण पाकळ्या

चिमूटभर हळद

चवीनुसार मीठ आणि मिरेपूड.

 

रेसिपी
१. सगळ्यात आधी मुगाची डाळ ३ ते ४ तास पाण्यात भिजवून ठेवा.

२. त्यानंतर चांगली भिजलेली मुग डाळ, कांदा, लसूण पाकळ्या, टोमॅटो, गाजर हे सगळं साहित्य मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्या.

विश्वकप जिंकताच मेस्सीची पत्नी झाली इमोशनल, बघा तिची व्हायरल पोस्ट आणि दोघांची अनोखी लव्हस्टोरी

३. वाटून घेतलेली पेस्ट गाळणीने गाळून घ्या.

४. त्यानंतर ती पेस्ट जेवढी असेल तिच्या दुप्पट पणी त्यात घाला आणि गॅसवर उकळायला ठेवा.

५. त्यात चिमुटभर हळद, चवीनुसार मीठ, मिरेपूड, आवडत असल्यास जिरेपूड आणि अर्धा चमचा साजूक तूप किंवा बटर टाका.

६. एक उकळी आली की मुगाच्या डाळीचं गरमागरम सूप तयार. 

 

Web Title: Moong dal soup recipe by actress Juhi Parmar. Simple and easy recipe of Moong dal soup 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.