नाश्त्याला काय करावं, हा प्रश्न बहुसंख्य घरातल्या महिलांना रोजच सकाळी अक्षरश: छळतो. कारण तेच ते पदार्थ केले तर ते घरात कोणालाही खावे वाटत नाही. काहीतरी वेगळं, चवदार करावं असं घरच्यांना वाटतं तर तो पदार्थ पौष्टिक, पोटभरीचा असावा, असं घरातल्या महिलांना वाटतं. या दोन्ही गोष्टी एकाच पदार्थामध्ये पाहिजे असतील तर तो पदार्थ आहे मुगाच्या डाळीचा उत्तपा. मुगाची डाळ पचायला हलकी असते. शिवाय हा उत्तपा करताना आपण त्यात थोडं बेसन घालणार आहोत (moong dal Uttapam recipe). त्यामुळे त्यातून भरपूर प्रमाणात प्रोटीन्स तर मिळणार आहेच, पण तो वजन कमी करणाऱ्या मंडळींसाठीही खूप फायदेशीर ठरणारा आहे (protein rich recipe for weight loss diet). शिवाय चव एवढी मस्त होईल की वयस्कर व्यक्तींपासून ते बच्चे कंपनीपर्यंत सगळ्यांनाच तो आवडेल.(how to make moong dal uttapa?)
मुगाच्या डाळीचा उत्तपा रेसिपी
साहित्य
१ कप मुगाची डाळ
अर्धा कप रवा
ड्राय झालेले केस फक्त ५ मिनिटांत होतील सिल्की- मुलायम! केसांवर करू लागाल प्रेम, बघा उपाय
अर्धा कप बेसनपीठ
१ टीस्पून आलं
१ टीस्पून लसूण
२ ते ३ हिरव्या मिरच्या
कडिपत्त्याची ७ ते ८ पाने
१ वाटी दही
Winter Fashion: करिना कपूरचा हा ड्रेस आवडला असेल तर तुम्हीही घेऊ शकता, किंमत अगदीच कमी...
चवीनुसार मीठ
१ टीस्पून मिरे
बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर सगळं मिळून १ वाटी
कृती
सगळ्यात आधी मुगाची डाळ स्वच्छ धुवून घ्या आणि ती किमान दोन ते तीन तास पाण्यात भिजत घाला. जर तुम्ही रात्रभर डाळ भिजवू शकला तर जास्त चांगलं.
यानंतर भिजवलेली मुगाची डाळ, कडिपत्ता, रवा, बेसन, मिरे, मिरच्या, आलं, लसूण हे सगळे पदार्थ मिक्सरमध्ये टाका आणि त्याचं बारीक पीठ करून घ्या. हे पीठ करताना त्यात खूप पाणी टाकून ते सैलसर करू नका.
हिवाळ्यात न चुकता करावा 'हा' व्यायाम; वजन भराभर कमी होईल- हृदय राहील मजबूत
यानंतर वाटण एका भांड्यात काढा. त्यात चवीनुसार मीठ आणि थोडासा बेकिंग सोडा घालून सगळं एकदा व्यवस्थित हलवून घ्या. बेकिंग सोडा घातल्याने उत्तपा हलका होतो. पण बेकिंग सोडा घातला नाही तरी चालेल.
आता तव्याला तेल लावून घ्या आणि त्यावर उत्तपा करण्यासाठी पीठ टाका. पीठ तव्यावर व्यवस्थित पसरवून घेतलं की त्यावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर टाका आणि नेहमीप्रमाणे छान गरमागरम उत्तपे करा.