Join us  

१ कप मूग डाळीचे करा कुरकुरीत वडे; झटपट बनेल खमंग नाश्ता-एकदा खाल तर खात राहाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2023 2:01 PM

Moong Dal Vada Recipe (Mugachya dalichi bhaji kashi karaychi)) : ब्रेकफास्टसाठी किंवा दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात ताटात वाढण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

सकाळच्या नाश्त्याला रोज काय नवीन करावं हे अनेकदा सुचत नाही. (Cooking Hacks) अशावेळी अनेकदा बाहेरून विकत घेतलेले पदार्थ खाल्ले जातात.  (Moong Dal Pakora) बाहेरचे पदार्थ खाण्यापेक्षा घरी बनवलेले पदार्थ अधिक पौष्टीक असतात. नाश्त्याला किंवा मुलांना शाळेचा डबा देण्यासाठी तुम्ही किचनमध्ये उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून खमंग-पौष्टीक पदार्थ बनवू शकता. (Mugachya dalichi bhaji Recipe) मुगाची डाळ पौष्टीक असते आणि पचायलाही हलकी असते. कपभर मुगाची डाळ वापरून तुम्ही कुरकुरीत वडे बनवू शकता. ब्रेकफास्टसाठी किंवा दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात ताटात वाढण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. (Moong Dal Vada Recipe)

मुगाच्या डाळीचे वडे कसे बनवायचे? (How to Make Moong Dal Vada)

1) मुगाच्या डाळीचे खमंग वडे करण्यासाठी सगळ्यात आधी साल असलेली हिरवी मुगाची डाळ धुवून २ तासांसाठी भिजवून घ्या.  ही डाळ २ पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. तुम्ही पिवळी मुगाची डाळही वापरू शकता पण सालासकट असेलल्या डाळीचा वापर केला तर अधिक पौष्टीक होते. 

२) २ तास डाळ भिजवून घेतल्यानंतर त्यातलं पाणी उपसून मिक्सरच्या भांड्यात डाळ घाला. त्यात २ ते ३ मिरचीचे तुकडे, कोथिंबीर, २ ते ३ टिस्पून लसणाचे काप, २ टिस्पून आल्याचे काप, धणे, जीरं वाटून एका भांड्यात काढून घ्या. त्यात पाव वाटी भिजवलेली मूगाची डाळ घाला. त्यात १ बारीक चिरलेला कांदा, कढीपत्त्याची पानं,  कोथिंबीर, हळद, चवीनुसार सैंधव मीठ घाला. 

१ कप बेसनाचा करा मऊ, स्पॉन्जी इडली ढोकळा; इडलीच्या स्टॅण्डमध्ये १० मिनिटांत बनेल चविष्ट नाश्ता

३) यात १ कप थालीपिठाची भाजणी घाला.  यात तुम्ही मक्याचे पीठ किंवा गव्हाचे पीठ घालू शकता. घरात भाकरीचे पीठ असेल तर ते ही वापरू शकता. 

४) वडे तळण्यासाठी एका कढईत तेल गरम करायला ठेवा. तेल गरम होईपर्यंत वडे थापण्याची तयार करा. हाताला तेल लावून त्यावर थोडं पीठ घेऊन एक गोळा तयार करून चपटा करा किंवा तुम्ही भजी प्रमाणे मोठा गोळाही ठेवू शकता.

ढाबास्टाईल डाळ पालक करण्याची सोपी रेसिपी; तोंडाला येईल चव-१० मिनिटांत बनेल चविष्ट डाळ

५) तेल गरम झाल्यानंतर त्यात एकामागोमाग एक वडे घाला.  ३ ते ४ मिनिटं वडे दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. 

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स