Join us  

कमी तेल पिणारे हिरव्या मुगडाळीचे मेदूवडे करण्याची सोपी रेसिपी, उडीद डाळीपेक्षा पचायलाही हलके आणि पौष्टिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2023 1:37 PM

Moong dal vada recipe : कपभर हिरव्या मुगाच्या डाळीचा करा कुरकुरीत मेदू वडा, उडीद डाळ न पचणाऱ्यांसाठीही खास सोपी पौष्टिक रेसिपी

ठळक मुद्देउडीद डाळीचा मेदू वडा आपण खाल्लाच असेल. पण कधी मूग डाळीचा मेदू वडा करून पाहिला आहे का? प्रोटीनयुक्त मूग डाळ खाण्याचे अनेक फायदे आहेत.

मेदू वडा (Medu Vada) हा पदार्थ दाक्षिणात्य पदार्थ आहे. मात्र, हा पदार्थ फक्त साऊथमध्ये तयार होत नसून, संपूर्ण भारतात तयार होते. मेदू वडा दक्षिण भारतीय आणि श्रीलंकन ​​तमिळ पाककृतींमध्ये खूप लोकप्रिय आहे. महराष्ट्रात देखील मेदू वडा फेमस आहे. अनेक भागात नाश्त्यासाठी मेदू वडा आवडीने केला जातो.

मेदू वडा बाहेरून कुरकुरीत व आतून सॉफ्ट असतात. मेदू वडा अनेक प्रकारचे केले जातात. उडीद डाळीचा मेदू वडा आपण खाल्लाच असेल. पण आपण कधी मूग डाळीचा मेदू वडा करून पाहिला आहे का? प्रोटीनयुक्त मूग डाळ खाण्याचे अनेक फायदे आहेत. ज्यामुळे आरोग्याला विविध पौष्टीक घटक मिळतात. मूग डाळीचा मेदू वडा कसा तयार करायचा? पाहूयात(Moong dal vada recipe | South indian healthy recipe ).

मूग डाळीचा मेदू वडा (Moong Dal Medu Vada) करण्यासाठी लागणारं साहित्य

हिरवे मूग डाळ

पाणी

आलं

हिरवी मिरची

कडीपत्ता

उपमा कधी फडफडीत तर, कधी गचका होतो? साऊथ इंडियन स्टाईल उपमा करण्याची पाहा सोपी कृती

काळी मिरी पूड

मीठ

ओलं खोबरं

तांदुळाचे पीठ

कृती

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये एक कप हिरवे मूग डाळ पाण्यात भिजत ठेवा. सकाळी मिक्सरच्या भांड्यात भिजवलेली मूग डाळ, गरजेनुसार पाणी घालून पेस्ट तयार करून घ्या. तयार पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात एक चमचा बारीक चिरलेलं आलं, बारीक चिरलेली कडीपत्ता, बारीक चिरलेली हिरवी मिरची, काळी मिरी पूड, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेलं ओलं खोबरं व २ चमचे तांदुळाचे पीठ घालून हाताने साहित्य एकजीव करा.

डोसा तव्याला चिकटल्यावर तुटतो? उलथताना लक्षात ठेवा एक सोपी ट्रिक; न तुटता डोसा तव्यावरून सहज निघेल

दुसरीकडे कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर हात पाण्यात बुडवून, थोडे बॅटर हातावर घ्या. बॅटरला मेदू वड्याचा आकार द्या, व हलक्या हाताने तेलात सोडा, व दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या. अशा प्रकारे हिरव्या मूग डाळीचा मेदू वडा खाण्यासाठी रेडी. आपण हा मेदू वडा सांबार किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स