Join us  

नाश्त्याला करा परफेक्ट प्रोटीन पॅक टिक्की, झटपट होणारी सोपी, चविष्ट रेसिपी....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2023 11:23 AM

Moong Paneer Tikki Perfect Protein pack Breakfast Recipe : अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत या टिक्की सगळ्यांनाच आवडतात.

नाश्त्याला रोज काय करायचं असा आपल्याला कायमच प्रश्न असतो. सकाळचं पहिलं खाणं असल्याने ते पौष्टीक आणि पोटभरीचं असणं गरजेचं असतं. पहिल्या आहारात प्रोटीन घेतले तर पोट भरलेले राहते आणि शरीराचे जास्त चांगल्या प्रमाणात पोषण होऊ शकते. हिरवे मूग ही आपल्या घरात सहज उपलब्ध असणारी गोष्ट. मूगामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असल्याने यात आपल्या घरात सहज उपलब्ध असणारे मसाले घालावेत. त्यामुळे या टिक्कीला अतिशय छान चव येते. झटपट होत असल्याने आणि पोटभरीचा पदार्थ असल्याने सकाळच्या वेळी सहज करता येईल असा हा पदार्थ आहे. चविष्ट असल्याने या टिक्की अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत या टिक्की सगळ्यांनाच आवडतात. या टिक्की कशा करायच्या पाहूयात (Moong Paneer Tikki Perfect Protein pack Breakfast Recipe)...

१. साधारण २ वाटी मूग घेऊन ते रात्रभर भिजत घालावेत. सकाळी थोडी वाफ आणून मिक्सरमधून बारीक करावेत. 

२. या मूगामध्ये पनीर बारीक करुन घालावे आणि त्यात बारीक चिरलेला कांदा आणिकोथिंबीर घालावी. 

३. यामध्ये मीठ, चाट मसाला आणि लिंबाचा रस घालून हे मिश्रण हाताने एकजीव करुन घ्यावे. 

४. आवडीनुसार यामध्ये आलं लसूण मिरचीची पेस्ट घातल्यास या टिक्कीला आणखीछान चव येण्यास मदत होते. 

५. हे सगळे मिश्रण चांगले एकजीव करुन त्याच्या एकसारख्या गोलाकार टिक्की करुनघ्याव्यात. 

६. पॅनमध्ये तेल घालून त्यावर या टिक्की दोन्ही बाजूने फ्राय करुन घ्याव्यात. 

७. खरपूस भाजल्या गेलेल्या या टिक्की सॉस, ग्रीन चटणी, दही किंवा अगदी नुसत्याही छान लागतात. 

८. पनीर आणि मूग असल्याने पोळीमध्ये रोल करुनही या टिक्की खाता येतात.  

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.