नेहमी त्याच त्या चवीच्या भाज्या, वरण खाऊन कधी कधी कंटाळा येतो. काहीतरी वेगळं पण तेवढंच खमंग आणि चवदार खावं वाटतं. असं काही वेगळं खाण्याची इच्छा होत असेल, तर सध्या बाजारात मुगाच्या हिरव्यागार कोवळ्या शेंगा आल्या आहेत. या शेंगांची आमटी अतिशय चवदार आणि खमंग होते (traditional method of making moong curry). शिवाय आमटी करण्यासाठी खूप काही मेहनत घ्यावी लागते असंही नाही. एरवी कोवळे लुसलुशीत मूग काही आवर्जून खाल्ले जात नाहीत. त्यामुळे ही आमटी करून बघा. लहान मुलांसकट मोठी मंडळीही आवडीने खातील. (How to make delicious moong aamti)
मुगाच्या शेंगा खाण्याचे फायदे
- कोवळ्या मुगांत व्हिटॅमिन ए आणि बी मोठ्या प्रमाणावर असते.
- यातून लोह तसेच कॅल्शियम, मँगनीज, पोटॅशियम, मॅग्नेशियम देखील भरपूर प्रमाणात मिळते.
- अपचन, जुलाब असा त्रास होत असल्यास कोवळे मूग खाणे अधिक फायदेशीर ठरते.
ढोल- ताशे वाजवून गणरायाच्या स्वागताला सज्ज मराठी कलावंत, बघा ढोल- पथकातील त्यांचा दणकेबाज सहभाग
मुगाच्या आमटीची रेसिपी
साहित्य
१ कप मुगाचे हिरवे कोवळे दाणे, ६ ते ८ लसूण पाकळ्या, ४ ते ५ हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा किसलेलं आलं, अर्ध्या लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, थोडीशी कोथिंबीर, फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग.
रेसिपी
- सगळ्यात आधी शेंगा सोलून त्यातील दाणे वेगळे काढून घ्या.
- आता कढई गॅसवर तापत ठेवा. त्यात अर्धा टेबलस्पून तेल टाका. तेल तापले की मुगाचे सोललेले दाणे, लसून आणि मिरच्या कढईत टाकून परतून घ्या.
- यावेळी गॅस मंद किंवा मध्यम ठेवावा. २ ते ३ मिनिटे हे सगळे पदार्थ परतून घेतले की गॅस बंद करा. आता हे सगळे पदार्थ थंड होऊ द्या.
- थंड झाल्यावर परतून घेतलेले मूग, लसूण, मिरच्या मिक्सरमध्ये टाका. त्याचवेळी त्यात थोडी कोथिंबीर आणि आलंही टाका. हे मिश्रण मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्या.
- आता पुन्हा कढई गॅसवर ठेवून फोडणी करा. त्यात हे वाटण टाका. वाटण परतून घेतलं की त्यात गरम पाणी टाकून आमटी हवी तेवढी पातळ करून घ्या. चवीनुसार मीठ टाका. चांगली उकळून घेतली की झाली खमंग, झणझणीत आमटी तयार.
image credit- google and https://www.youtube.com/watch?v=C-_lnNPn23I