Lokmat Sakhi >Food > मोड आलेल्या मुगाचा ढोकळा, ही घ्या कपभर मुगाची खास रेसिपी पौष्टिक ‘ग्रीन ढोकळा!’

मोड आलेल्या मुगाचा ढोकळा, ही घ्या कपभर मुगाची खास रेसिपी पौष्टिक ‘ग्रीन ढोकळा!’

Moong Sprouts Dhokla : Healthy Sprouted Moong n Suji Dhokla : Sprouted Moong Dhokla : मोड आलेल्या मुगाचा डोसा, आमटी, उसळ असे पदार्थ खातो पण कधी हिरव्या मुगाचा ढोकळा खाल्ला आहे का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2024 06:18 PM2024-08-23T18:18:32+5:302024-08-23T18:21:27+5:30

Moong Sprouts Dhokla : Healthy Sprouted Moong n Suji Dhokla : Sprouted Moong Dhokla : मोड आलेल्या मुगाचा डोसा, आमटी, उसळ असे पदार्थ खातो पण कधी हिरव्या मुगाचा ढोकळा खाल्ला आहे का ?

Moong Sprouts Dhokla Healthy Sprouted Moong n Suji Dhokla Sprouted Moong Dhokla | मोड आलेल्या मुगाचा ढोकळा, ही घ्या कपभर मुगाची खास रेसिपी पौष्टिक ‘ग्रीन ढोकळा!’

मोड आलेल्या मुगाचा ढोकळा, ही घ्या कपभर मुगाची खास रेसिपी पौष्टिक ‘ग्रीन ढोकळा!’

आपण हेल्दी राहण्यासाठी हेल्दी पदार्थ खाल्ले पाहिजे. सकाळचा नाश्ता हा सर्वात महत्वाचा असतो, सकाळचा हेल्दी नाश्ता खाल्ल्याने आपल्याला दिवसभरासाठी एनर्जी मिळते. यासाठी सकाळच्या नाश्त्यात हेल्दी पदार्थ खाणे महत्वाचे असते. यासोबतच आजकाल सगळेच आपल्या हेल्थकडे विशेष लक्ष देतात. सकाळच्या हेल्दी नाश्त्यात आपण ओट्स, दलिया, फ्रुट सॅलॅड असे अनेक हेल्दी पदार्थ खातो. परंतु रोज तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो अशावेळी काहीतरी चटपटीत पण हेल्दी खावेसे वाटते. नाश्त्याला आपण हिरव्या मुगाचा हेल्दी चटपटीत ढोकळा खाऊ शकतो. आपण नेहमीच पिवळाधम्मक ढोकळा खातो. हा ढोकळा बेसन पिठाचा वापर करुन तयार केला जातो त्यामुळे तो फारसा हेल्दी नसतो. यासाठी जर का तुम्हाला काही हेल्दी खायचे असेल तर आपण मोड आलेल्या हिरव्या मुगाचा ढोकळा तयार करुन खाऊ शकतो. हिरव्या मुगाचा डोसा, आमटी, उसळ असे अनेक पदार्थ आपण करतो पण कधी मोड आलेल्या हिरव्या मुगाचा ढोकळा करुन पाहिला आहे का ? (Easy to Make Breakfast Recipe).

गुजरातमधील थेपला, खांडवी, खाकरा, ढोकळा यांसारखे अनेक पदार्थ तर फारच लोकप्रिय आहेत. ढोकळ्याचे अनेक प्रकार आहेत. बेसन ढोकळा, रवा ढोकळा, खमंग ढोकळा हे प्रकार तुम्ही नक्कीच खाल्ले असतील. पण मोड आलेल्या हिरव्या मुगाचा ढोकळा तुम्ही कधी खाल्ला आहे का? मऊ, लुसलुशीत, पचायला हलका अशा मोड आलेल्या हिरव्या मुगाच्या (Sprouted Moong Dhokla) ढोकळ्याची रेसिपी पाहूयात. फिटनेस फ्रिक लोकांसाठी तर हा एक बेस्ट ऑप्शन आहे(Sprouted Moong Dhokla Recipe).

साहित्य :- 

१. मोड आलेले मूग - १ कप 
२. कोथिंबीर - ३ ते ४ टेबलस्पून 
३. हिरव्या मिरच्या - ३ ते ४
४. आलं - १ लहान तुकडा
५. पाणी - १/२ कप
६. मीठ - चवीनुसार 
७. बारीक रवा - २ टेबलस्पून 
८. फ्रुट सॉल्ट किंवा इनो - १ छोटं पाकीट 
९. तेल - २ टेबलस्पून 
१०. जिरे - १/२ टेबलस्पून 
११. मोहरी - १/२ टेबलस्पून 
१२. हिंग - १/२ टेबलस्पून 
१३. कडीपत्ता - ६ ते ८ पाने 
१४. तीळ - १/२ टेबलस्पून 

गडबडीत दूध करपले? ६ सोपे उपाय, करपलेल्या दुधाचा ' असा ' करा मस्त वापर...

कृती - 

१. मिक्सरच्या भांड्यात मोड आलेले मूग, हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा, कोथिंबीर आणि गरजेनुसार पाणी घालून हे सगळे मिश्रण एकदम बारीक वाटून घेऊन त्याचे बॅटर तयार करुन घ्यावे. 
२. हे तयार बॅटर एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्यावे. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ आणि बारीक रवा घालून हे बॅटर व्यवस्थित मिक्स करुन घ्यावे. आता हे बॅटर मिक्स करुन वरुन झाकण ठेवून १५ मिनिटांसाठी झाकून ठेवावे. 
३. १५ मिनिटांनंतर या बॅटरमध्ये फ्रुट सॉल्ट किंवा इनो या दोघांपैकी कोणताही एक पदार्थ मिक्स करुन हे बॅटर व्यवस्थित ढळवून एकजीव करुन घ्यावे. 

कुरकुरीत त तरी कांदा भजी मऊ पडतात? सोप्या ४ टिप्स, भजी राहतील कुरकुरीत...

४. आता एका मोठ्या डिशला तेल लावून ती डिश ग्रीस करुन घ्यावी. या ग्रीस केलेल्या डिशमध्ये हे ढोकळ्याचे बॅटर घालावे. 
५. त्यानंतर ही डिश स्टीमरमध्ये ठेवून हाय फ्लेमवर १२ ते १५ मिनिटे हा ढोकळा व्यवस्थित वाफवून घ्यावा. 
६. आता एका छोट्या भांड्यात तेल घेऊन त्यात जिरे, मोहरी, हिंग, कडीपत्ता, तीळ घालून खमंग फोडणी तयार करुन घ्यावी. ही खमंग फोडणी ढोकळ्यावर घालावी. त्यानंतर या ढोकळ्याचे चौकोनी काप करुन घ्यावेत. 

आपला हेल्दी हिरव्या मुगाचा ढोकळा खाण्यासाठी तयार आहे. हा ढोकळा आपण सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करु शकता.

Web Title: Moong Sprouts Dhokla Healthy Sprouted Moong n Suji Dhokla Sprouted Moong Dhokla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.