थंडीच्या दिवसात (winter) बाजारात ताजे आवळे दिसायला सुरूवात होते. आवळ्याचा वापर करून तुम्ही वेगवेगळ्या रेसेपिज ट्राय करू शकता. (Morawala Recipe) ताज्या आवळ्यांपासून तुम्ही अनेक महिने टिकून राहील असा मोरावळा बनवू शकता. (Morawala Recipe) मोरावळा चवील उत्तम असतो जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी मोरावळा असेल तर साधी चपाती भाजी किंवा भात बनवला असेल तरी जेवणाची चव वाढेल. (Amla Murabba Recipe in Marathi) आवळ्याच्या सेवनाने शरीराला भरपूर फायदे मिळतात. रोगप्रतिकारकशक्तीही वाढते.
झटपट मोरावळा करण्याची सोपी रेसिपी (Amla Murabba Recipe)
१) मोरावळा बनवण्यासाठी तुम्ही इडलीच्या भांड्याचा वापर करू शकता. कारण त्यात झटपट मोरावळा बनून तयार होईल. सगळयात १० ते १२ आवळे स्वच्छ धुवून घ्या. आवळे धुवून झाल्यानंतर इडलीच्या साच्यात आवळे ठेवा.
२) त्यानंतर कुकरचं झाकण लावून १० ते १५ मिनिटांसाठी आवळे वाफवून घ्या. आवळे वाफवल्यानंतर गॅस बंद करा आणि कुकरचं झाकण उडल्यानंतर आवळा हातात घेऊन त्याला काटा चमच्याच्या साहाय्याने छिद्र पाडून घ्या.
कंबर, गुडघे सतत दुखतात? रोज हा १ लाडू खा-हाडं होतील बळकट; साखर-गूळ न घालता झटपट होतील लाडू
३) नंतर आवळे एका कढईत घाला त्यात ब्राऊन शुगर आणि पाणी घालून एकजीव करून घ्या. मंच आचेवर आवळे शिजू द्या. आवळे अर्धवट शिजल्यानंतर त्यात दालचिनी, लवंग आणि वेलची घाला. आवळ्याचा पाक घट्ट होईपर्यंत शिजवून घ्या आणि चमच्याच्या साहाय्याने ढवळून घ्या. नंतर गॅस बंद करा तयार आहे मोरावळा.
आवळ्यापासून इतर कोणते पदार्थ बनवता येतात?
१) आवळा कॅन्डी - आवळा तुम्ही अनेक प्रकारे खाऊ शकता. जे शरीरासाठी अत्यंत लाभदायक ठरते. बाजारात मिळणाऱ्या आवळा कॅन्डीज खाण्यापेक्षा तुम्ही घरच्याघरी आवळा कॅन्डी बनवू शकतात. लहान मुलांपासून मोठी माणसांपर्यंत सर्वचजण हा पदार्थ खाऊ शकता.
ताकाची कढी करण्याची सोपी-परफेक्ट रेसिपी; अजिबात फुटणार नाही-कमी साहित्यात बनेल कढी
२) आवळा लाडू - आवळ्याचे सेवन हिवाळ्याच्या दिवसांत करणं फायदेशीर ठरते. आवळ्यापासून तयार केलेले लाडू खाल्ल्याने इम्यूनिटी वाढण्यास मदत होते. लहान मुलं आवळा खात नाहीत पण लाडू आवडीने खातील.
३) आवळ्याची चटणी- आवळ्याची तिखट चटणी खूपच चविष्ट असते. ही चटणी तुम्ही समोरे, कचोरी किंवा भजीबरोबर खाऊ शकता. ही चटणी रोज खाल्ल्याने तब्येतीला बरेच फायदे मिळतात. पोटाचे त्रास टळतात.