Join us

मूठभर शेवग्याच्या पानांची चटणी करा, चमचाभर चटणी देते हाडांना ताकद भरपूर - पाहा रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2025 12:01 IST

Moringa leaves Chutney : How To Make Moringa leaves Chutney : Moringa leaves Dry Chutney : शेवग्याच्या पानांची सुकी चटणी करण्याची सोपी रेसिपी....

शेवग्याच्या शेंगा आणि त्याचा पाला यांची भाजी आपण करतोच. शेवग्याच्या शेंगा आपल्या आहारात समाविष्ट करणे फार उपयुक्त आणि आरोग्यदायी असते. शेवग्याच्या शेग्यांमध्ये अनेक पौष्टीक घटकांचा (How To Make Moringa leaves Chutney) समावेश असतो. यात भरपूर प्रमाणात प्रोटीन, अमीनो अ‍ॅसिड, बीटा कॅरटीन, कॅल्शियम, फायबर, सोडियम यासह इतर पौष्टीक घटक आढळतात. फक्त शेंगाच नाही तर, त्याच्या पानात देखील अनेक पौष्टीक घटक असतात(Moringa leaves Dry Chutney).

शेवग्याच्या शेंगांची आमटी, भाजी, सूप असे अनेक पदार्थ आपण तयार करुन खातोच. परंतु या शेवग्याच्या शेंगांप्रमाणे शेवग्याच्या पानांचे देखील अनेक पौष्टिक पदार्थ तयार करता येतात. या पाल्याची भाजी तसेच त्याची पावडर तयार करून सूप किंवा चपात्यांमध्ये मिसळून पदार्थांची पौष्टिकता अधिक वाढवता येते. अशा (Moringa leaves Chutney) या शेवग्याच्या पानांची तोंडी लावायला म्हणून मस्त झणझणीत सुकी चटणी देखील करता येते. शेवग्याच्या पानांची सुकी चटणी अगदी झटपट घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यात करता येते. शेवग्याच्या पानांची सुकी चटणी करण्याची सोपी रेसिपी पाहूयात.

साहित्य :- 

१. तेल - २ टेबलस्पून २. चणा डाळ - २ टेबलस्पून ३. पांढरी उडीद डाळ - २ टेबलस्पून ४. शेंगदाणे - २ टेबलस्पून ५. धणे - २ टेबलस्पून ६. जिरे - २ टेबलस्पून ७. लाल सुक्या मिरच्या - ६ ते ७ सुक्या मिरच्या ८. आळशी - २ टेबसलस्पून ९. शेवग्याच्या शेंगांचा पाला - २ कप १०. कडीपत्ता - १ कप ११. चिंच - १ टेबलस्पून १२. मीठ - चवीनुसार 

फक्त १० मिनिटांत करा ‘भरुचचे खारे शेंगदाणे’ घरच्याघरी, पाहा एकदम सोपी झटपट रेसिपी...

घरी पनीर करताना लक्षात ठेवा ८ टिप्स, पनीर होईल विकतसारखं मऊमुलायम परफेक्ट...

कृती :- 

१. सगळ्यात आधी एक मोठी कढई घेऊन त्यात तेल ओतावे. तेल व्यवस्थित गरम झाल्यावर त्यात चणा डाळ आणि पांढरी उडीद डाळ घालावी. २.  त्यानंतर त्यात शेंगदाणे, धणे, जिरे, लाल सुक्या मिरच्या, आळशी घालून सगळे जिन्नस एकत्रितपणे तेलात परतून घ्यावेत. ३. हे सगळे जिन्नस तेलात परतून झाल्यावर एका डिशमध्ये काढून थोडे थंड होण्यासाठी ठेवावेत. ४. आता एका भांड्यात थोडे तेल घालून ते गरम करून घ्यावे. या गरम तेलात शेवग्याच्या पानांचा पाला घालून हलकेच परतून घ्यावा. ५. त्यानंतर त्याच भांड्यात कडीपत्ता घालूंन तो देखील थोडा क्रिस्पी होईपर्यंत परतून घ्यावा. 

६. आता मिक्सरच्या भांड्यात तेलात भाजून घेतलेले सगळे जिन्नस आणि चिंचेचा छोटा गोळा घालून सगळे मिश्रण एकजीव होईपर्यंत वाटून घेऊन त्याची बारीक पूड करावी. ७. त्यानंतर या वाटून घेतलेल्या मिश्रणात भाजून घेतलेला शेवग्याच्या पानांचा पाला आणि कडीपत्ता घालावा. पुन्हा एकदा सगळे मिश्रण एकत्रित वाटून त्याची बारीक पूड करुन घ्यावी. 

शेवग्याच्या पाल्याची सुकी चटणी खाण्यासाठी तयार आहे. आपण ही तयार चटणी एका काचेच्या हवाबंद बरणीत स्टोअर करुन ठेवू शकता.

टॅग्स :अन्नपाककृती