Join us

शेवग्याचे सूप म्हणजे तब्येतीसाठी संजीवनी! 'असे ' करा आणि पौष्टिक व चविष्ट सूप प्या रोज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2025 14:56 IST

Moringa Soup - Most Healthy And Tasty Soup Ever : शेवग्याच्या शेंगांचं सुप कधी प्यायला आहात का ? नाही तर ही घ्या रेसिपी

शेवग्याच्या शेंगा अत्यंत पौष्टिक असतात. त्यामध्ये प्रथिने असतात. तसेच अनेक जीवनसत्वे असतात. फॉस्फरस असते. (Moringa Soup - Most Healthy And Tasty Soup Ever)भरपूर फायबर असते. तसेच शेंगा खाल्याने हाडे मजबूत होतात. दातांच्या आरोग्यासाठी शेवगा फार चांगला. शेवग्याने पचनक्रियाही सुधारते. मधुमेह, हृदय विकार, आदी सर्वच आजारांवर शेवगा हे जालीम औषध आहे. सध्या वजन कमी करण्यासाठी सगळेचे मोरींगा पावडर विकत घेत आहेत. (Moringa Soup - Most Healthy And Tasty Soup Ever)हा मोरींगा प्रकार दुसरा तिसरा काही नसून शेवग्याच्या शेंगांची पावडरच आहे. आपल्या भारतीय आहारात अनेक वर्षांपासून या शेवग्याला महत्व आहे. घरीच या शेंगांचे विविध पदार्थ तयार करून खाणे हे विकतच्या मोरींगा पावडरपेक्षा जास्त फायदेशीर ठरेल.  

शेवग्याची आमटी आपण घरी तयार करतोच. चवीला फारच छान असते. तसेच काही घरांमध्ये शेवग्याची भाजी तयार करतात. जी फार पौष्टिक असते. (Moringa Soup - Most Healthy And Tasty Soup Ever)शेवग्याचे अजूनही काही पदार्थ तयार करता येतात. त्यातील एक म्हणजे शेवग्याचे सूप चवीला कमाल लागतच पण अत्यंत पौष्टिक आहे. वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर ठरते. 

साहित्य:शेवग्याच्या शेंगा, पाणी, मीठ, हळद, जीरं, हिंग, तूप

कृती:१. चांगल्या ताज्या शेवग्याच्या शेंगा वापरा. जून शेंग नको. शेंगा व्यवस्थित धुवून घ्या. शेंगांचे तुकडे करून घ्या. कुकरच्या भांड्यात शेंगाचे तुकडे घ्या. त्यात पाणी घाला. पाण्यात  शेंगा पूर्ण बुडतील एवढं पाणी वापरा. त्यात मीठ घाला. हळद घाला आणि कुकरच्या ३ ते ४ शिट्या काढून घ्या. 

२. आता त्या शेंगा कुकरमधून काढून घ्या. जरा गार होऊ द्या. ज्या पाणीत उकडल्यात त्याच पाण्याबरोबर शेंगा मिक्सरमधून फिरवून घ्या. पाणी कमी असेल तर जास्तीचे वापरा. अगदी पातळ करून घ्या. 

३. नंतर व्यवस्थित गाळून घ्या. चोथा काढून टाका. शेंगांचा रस वाया जाऊ देऊ नका. 

४. एका कढईमध्ये तूप गरम करा. त्यात जीरं, हिंगाची फोडणी तयार करा. मग त्यामध्ये तयार रस घाला. आणि एक उकळी काढून घ्या. चवीनुसार मीठ घाला.  

टॅग्स :अन्नआहार योजनाभाज्यावेट लॉस टिप्स