आतापर्यंत आपण फेमस स्ट्रीट फूड मुंबईचा वडापाव हा पदार्थ खाल्लाच असेल. चमचमीत बटाट्याच्या भाजीवर बेसनचे कोटिंग, पावावर लाल - हिरवी मिरचीच्या चटणीसह हा वडा अप्रतिम लागतो. कुरकुरीत वड्यासह जर तळलेली हिरवी मिरची मिळाली, तर खाण्याची मज्जा आणखी वाढते. गल्लोगल्लीत मिळणाऱ्या या पदार्थाची खासियत काही वेगळीच आहे.
मात्र, आपण कधी वडापाववर एक्सपेरीमेंट करून पहिला आहे का? बहुतांश ठिकाणी उलटा वडापाव फार फेमस आहे. यात फरक इतकाच की, वडा बाहेर आणि त्याच्या आतमध्ये पाव असतो. या चमचमीत रेसिपीला काही ठिकाणी पाव वडा तर काही ठिकाणी उलटा वडा पाव असे म्हणतात. आपण ही रेसिपी घरच्या साहित्यात झटपट बनवू शकता. चला तर मग या हटके पदार्थाची कृती पाहूयात(Most popular ulta vada pav recipe - street style food).
उलटा वडा पाव बनवण्यासाठी लागणारं साहित्य
बटाटे
तेल
मोहरी
आलं
हिरवी मिरची
धणे पूड
हळद
लाल तिखट
गरम मसाला
मीठ
चाट मसाला
पाणी
कोथिंबीर
बेसन
ओवा
बेकिंग सोडा
ब्रेड
टॉमेटो केचअप
हिरवी चटणी
तेल
कृती
सर्वप्रथम, एका पॅनमध्ये तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी, हिरवी मिरची, आलं घालून मिक्स करा. आता त्यात उकडलेले बटाटे कुस्करून करून मिक्स करा. आता त्यात धणे पूड, हळद, गरम मसाला, चाट मसाला, लाल तिखट, मीठ व थोडं पाणी घालून संपूर्ण मिश्रण चांगले मिक्स करा. बटाट्याला मिश्रणात चांगले कुस्करून करून घ्या. वरून कोथिंबीर घाला. अशा प्रकारे आपली फर्स्ट स्टेप म्हणजेच भाजी रेडी झालेली आहे.
करा कोबीच्या खमंग कुरकुरीत वड्या, कोण म्हणते कोबी बेचव लागते? मस्त झटपट रेसिपी..
एका बाऊलमध्ये बेसन घ्या, त्यात पाणी घालून मिश्रण मिक्स करा. आता त्यात ओवा, लाल तिखट, मीठ आणि बेकिंग सोडा घालून संपूर्ण मिश्रण एकत्र करा. आपली दुसरी स्टेप बेसनचं बॅटर रेडी झालेलं आहे.
हॉटेलस्टाइल कुरकुरीत कांदा भजी करण्याची १ झटपट ट्रिक, भजी होतील खमंग
आता चॉपिंग बोर्डवर ब्रेडचे ४ चौकोनी काप करून घ्या. एका ब्रेडवर टॉमेटो केचअप लावा. तर, दुसऱ्या ब्रेडवर हिरवी चटणी लावा. चटणी लावलेली बाजू एकत्र चिटकवा. आता दोन्ही बाजूने बटाट्याच्या भाजीने ब्रेडला कोट करा. आता हे तयार ब्रेड बेसनाच्या तयार बॅटरमध्ये बुडवून गरम तेलात तळून घ्या. ज्याप्रमाणे बटाटे वडे तळून घेतो, त्याचप्रमाणे उलटा वडा पाव तळून घ्या. अशा प्रकारे कुरकुरीत खमंग उलटा वडा पाव खाण्यासाठी रेडी.