Join us  

आईच्या हातचं जगात भारी! विद्या बालन सांगतेय, तिच्या आईच्या हातच्या खास पदार्थाची गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2022 12:00 PM

साऊथ इंडियन पदार्थांबरोबर खाल्ल्या जाणाऱ्या कोरड्या चटणीची रेसिपी...

ठळक मुद्देम्हणून विद्याला आवडते आईच्य हातची ती खास चटणी...कधीही पटकन खाता येणारी ही चटणी आपणही घरात करुन ठेऊ शकतो..

आपल्या आईनं केलेले बहुतांश पदार्थ आपल्यासाठी नेहमीच खास असतात. जगात कुठेही गेलो तरी आईच्या हातच्या पदार्थाची चव दुसऱ्या कशाला येत नाही. कोणतीही नेमकी रेसिपी, त्याचे नेमके प्रमाण असे काहीही नसताना आईच्या हातालाच चव असते हे काही खोटे नाही. त्यामुळे अनेकदा त्यांनी अगदी साधी मूगाच्या डाळीची खिचडी किंवा पिठलं केलं तरी ते खूप मस्त लागतं. अभिनेत्रीही बऱ्याचदा आपल्या आईने केलेल्या पदार्थांचे कौतुक करताना दिसतात. नुकतेच प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) हिने आपल्या आईच्या हातच्या दक्षिण भारतीय पदार्थाचे कौतुक करत त्याविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

(Image : Google)

विद्या बालनचा अभिनयच नाही तर तिची स्टाईल, अॅटीट्यूड, तिची स्माईल ही तिच्या चाहत्यांसाठी अतिशय खास आहे. विद्या बालन हिची आई दक्षिण भारतीय (South Indian Food) असल्याने ती दक्षिण भारतीय पदार्थ खातच लहानाची मोठी झाली. साऊथ इंडियन पदार्थ असलेली इडली, डोसा, उतप्पा किंवा भात यांसारख्या पदार्थांबरोबर खाल्ली जाणारी मोलागापोडी (Molagapodi) म्हणजेच एकप्रकारची चटणी पावडर तर दक्षिणेकडील पदार्थांमधील एक स्पेशल पदार्थ आहे. आपल्या आईच्या हातची ही चटणी आपल्याला खूप आवडत असल्याचे विद्या आवर्जून सांगते. ताज्या तूपामध्ये घातलेली ही चटणी आणि डोसे किंवा गरमागरम भातावर ही चटणी टाकून खाल्ल्यास त्याची सर जगातील कोणत्याच पदार्थाला येणार नाही असे विद्या म्हणते. 

प्रसिद्ध लेखिका सुधा मेनन (Sudha Menon) यांच्या नुकत्यात प्रसिद्ध झालेल्या रेसिपी फॉर लाईफ (Recipe for life) या पुस्तकात त्यांनी अनेक प्रसिद्ध अभिनेते, खेळाडू यांसारख्या सेलिब्रिटींची आई करत असलेल्या स्पेशल रेसिपींचा या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे. याबरोबरच या पदार्थांबरोबरच्या आपल्या आठवणीही प्रत्येकाने या पुस्तकाच्या निमित्ताने वाचकांना सांगितल्या आहेत. विद्या बालनने या पुस्तकाच्या निमित्तानेच आपल्या आईच्या हातच्या मोलागापोडी चटणीविषयी सांगितले आहे. याशिवाय आईच्या हातच्या साऊथ इंडियान स्वीट डीशविषयीही विद्याने यामध्ये सांगितले आहे. पाहूया कशी करतात मोलागापोडी चटणी

(Image : Google)

साहित्य - 

१. खोबरेल तेल किंवा साजूक तूप- १ चमचा २. उडीद डाळ - १ वाटी३. हरभरा डाळ - पाव वाटी ४. सुक्या लाल मिरच्या - ८ ते १० ५. हिंग - १ लहान चमचा ६. मीठ - गरजेनुसार 

 

कृती - 

१. हरभरा डाळ आणि उडीद डाळ तेलामध्ये भाजून घ्या. गुलाबी रंग येईपर्यंत या डाळी चांगल्या भाजा.२. डाळी बाजीला एका ताटलीत काढून घेऊन त्यातच लाल मिरच्या भाजून घ्या. ३. गार झाल्यानंतर या सगळ्यामध्ये हिंग आणि मीठ घालून सगळे मिक्सर करा.४. खोबरेल तेल किंवा तूप यांचा वापर केल्याने या चटणीला एक विशिष्ट चव येते. त्यामुळे इतर तेलांपेक्षा या दोनपैकी एकाचा वापर करावा. ५. अशापद्धतीने अतिशय चविष्ट अशी मोलागापोडी चटणी तयार होईल.६. ही चटणी तुम्ही उपमा, पोळी, गरम भात, इडली, डोसा, उतप्पा यांसारख्या पदार्थांबरोबर खाऊ शकतात. 

 

टॅग्स :अन्नविद्या बालनपाककृती