Lokmat Sakhi >Food > मुळ्याची चटपटीत चटणी खाऊन पाहिली? जेवणाची रंगत वाढविणारी सोपी रेसिपी- ५ मिनिटांत चटणी तयार...

मुळ्याची चटपटीत चटणी खाऊन पाहिली? जेवणाची रंगत वाढविणारी सोपी रेसिपी- ५ मिनिटांत चटणी तयार...

Delicious Winter Food: मुळ्याचे पराठे तर नेहमीच खाता. आता यावेळी मुळ्याची चटपटीत चटणी खाऊन पाहा...(muli ki chutney recipe)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2024 02:06 PM2024-11-29T14:06:58+5:302024-11-29T14:07:58+5:30

Delicious Winter Food: मुळ्याचे पराठे तर नेहमीच खाता. आता यावेळी मुळ्याची चटपटीत चटणी खाऊन पाहा...(muli ki chutney recipe)

muli ki chutney recipe, how to make raddish chutney, delicious winter food | मुळ्याची चटपटीत चटणी खाऊन पाहिली? जेवणाची रंगत वाढविणारी सोपी रेसिपी- ५ मिनिटांत चटणी तयार...

मुळ्याची चटपटीत चटणी खाऊन पाहिली? जेवणाची रंगत वाढविणारी सोपी रेसिपी- ५ मिनिटांत चटणी तयार...

Highlightsपराठ्यासोबत, पोळीसोबतही तुम्ही ही चटणी खाऊ शकता. बघा अतिशय झटपट आणि मोजक्याच साहित्यात तयार होणारी सोपी रेसिपी...

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये चवीने खाणाऱ्या खवय्यांची मजा असते. कारण या दिवसांत पालेभाज्या भरपूर प्रमाणात मिळतात. त्याशिवाय इतर भाज्या, गाजर, मुळा, बीट अशी कंदमुळंही भरपूर प्रमाणात आणि खूप फ्रेश मिळतात (Delicious Winter Food). आता हिवाळा आला म्हटलं की मुळ्याचे पराठे तर घरोघरी होतातच. काही ठिकाणी मुळ्याचं लोणचंही केलं जातं. आता मात्र तुम्ही मुळ्याची चटणी खाऊन पाहा. ही चटणी जेवणात तोंडी लावायला असली की जेवणाची रंगत निश्चितच वाढेल (muli ki chutney recipe). शिवाय पराठ्यासोबत, पोळीसोबतही तुम्ही ही चटणी खाऊ शकता (how to make raddish chutney?). बघा अतिशय झटपट आणि मोजक्याच साहित्यात तयार होणारी सोपी रेसिपी...

 

मुळ्याची चटणी करण्याची रेसिपी

मुळ्याची चटणी कशी करायची याची रेसिपी foodophile_saloni या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

साहित्य

२ टोमॅटो 

लसूणाच्या ५ ते ६ पाकळ्या

२ ते ३ हिरव्या मिरच्या

वजन कमी करण्यासाठी हिवाळा आहे एकदम परफेक्ट! रोज खा 'या' भाज्या आणि भराभर वजन उतरवा

१ मध्यम आकाराचा मुळा

२ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर

१ टीस्पून धणेपूड आणि जिरेपूड

१ टीस्पून चाट मसाला

एका लिंबाचा रस

चवीनुसार मीठ आणि लाल तिखट

१ टेबलस्पून तेल

 

कृती

टोमॅटो मधोमध चिरून त्याचे दोन तुकडे करून घ्या. तसेच मुळा किसून घ्या आणि कोथिंबीर चिरून घ्या.

यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवा. त्यामध्ये तेल टाका. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो, लसूण, मिरच्या टाका आणि छान परतून घ्या. 

महिलेची कमाल! एका वर्षात केले ३ लग्न आणि कमावले ३६ लाख, फ्लॅश मॅरेज करून तरुणांना फसवले

टोमॅटो, मिरच्या, लसूण व्यवस्थित परतून झाल्यानंतर गॅस बंद करा. हे तिन्ही पदार्थ जेव्हा थंड होतील तेव्हा ते खलबत्त्यामध्ये घाला. त्यातच किसलेला मुळा आणि कोथिंबीर घाला. चवीनुसार मीठ, लाल तिखट, चाट मसाला, धणेपूड, जिरेपूड, लिंबाचा रस घालून व्यवस्थित कुटून घ्या. 

जर तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सगळे पदार्थ फिरवून घेतले तरी चालेल. पण मिक्सरमधून फिरवताना वाटण खूप बारीक करू नका. चटणी थोडी जाडीभरडीच ठेवा. 


 

Web Title: muli ki chutney recipe, how to make raddish chutney, delicious winter food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.