Join us  

पीठ न आंबवताही करा आता इडली आणि मेदूवडे! इन्स्टंट पिठाची पौष्टिक रेसिपी- पित्ताचा त्रासही कमी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2023 1:46 PM

Multipurpose Instant Premix for Upma, Rava Idli & Medu Vada : काही जणांना आंबवलेले पदार्थ खाल्ले की पित्त होते, त्यावर हा इन्स्टंट उपाय-इडल्या-वडे करा पीठ न आंबवत

इडली, उपमा, मेदू वडा हे पदार्थ आपण बरेचदा नाश्त्याला खातो. इडली, उपमा, मेदू वडा, डोसा असे अनेक दाक्षिणात्य पदार्थ आपण नाश्त्याला आवडीने खातो. इडली, उपमा, मेदू वडा, डोसा हे झटपट होणारे पदार्थ असल्यामुळे गृहिणी बहुतेकवेळा नाश्त्याला असेच पदार्थ बनवतात. हे पदार्थ बनवायला जरी सोपे आणि झटपट होणारे असले तरी त्याच्या प्रमाणाचे गणित चुकले तर हे पदार्थ बिघडतात. यामुळे काहीवेळा सकाळचा नाश्ता फसतो आणि आपलाच हिरमोड होतो. तसेच दुसरीकडे बदलत्या काळानुसार, पुरुषांनादेखील घराची जबाबदारी अनेक कारणास्तव उचलावी लागते. अशावेळी काही पुरुषांना घरात काहीवेळा स्वयंपाक करावा लागतो. तेव्हा त्यांना करण्यासाठी म्हणून सर्वात सोपे पदार्थ म्हणजे इडली, उपमा, मेदू वडा, डोसा. 

काहीवेळा घरांतील वर्किंग वुमन ही अनेक कामांत व्यस्त असते. त्यामुळे घाईगडबडीत बहुतेकवेळा सगळ्यांचा नाश्ता बनवायला पुरेसा वेळ मिळत नाही. अशावेळी काहीतरी चटकन बनवता येणारे इन्स्टंट फूड आपल्याला हवे असते. आता नाश्ता बनविण्याचे टेंशन विसरा, कारण आपण घरच्या घरी एकच प्रिमिक्स तयार करुन त्यापासून इडली, उपमा, मेदू वडा चटकन तयार करु शकतो. आता हे पदार्थ तयार करण्यासाठी आपल्याला पीठ आंबविण्याची प्रक्रिया न करता इन्स्टंट प्रिमिक्स वापरुन आपण झटपट नाश्ता तयार करु शकतो(Multipurpose Instant Premix for Upma, Rava Idli & Medu Vada).          

साहित्य :- 

१. तेल - २ ते ३ टेबलस्पून २. हिरवी मिरची - २ ते ३ (बारीक चिरलेल्या)३. मोहरी - १ टेबलस्पून ४. पांढरी उडीद डाळ - १ टेबलस्पून ५. चणा डाळ - १ टेबलस्पून ६. कढीपत्ता - ५ ते ६ पानं ७. तूप - १ टेबलस्पून ८. हिंग - चिमूटभर ९. आलं - १/२ टेबलस्पून (किसून घेतलेलं) १०. काजू - १ टेबलस्पून (बारीक तुकडे करुन घेतलेले)११. शेंगदाणे -  १ टेबलस्पून (बारीक तुकडे करुन घेतलेले)१२. बारीक रवा - ४ कप १३. कोथिंबीर - २ ते ३ टेबलस्पून 

 

कृती :- 

१. सर्वप्रथम एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, मोहरी, पांढरी उडीद डाळ, चणाडाळ, कढीपत्ता, तूप, चिमूटभर हिंग घालून घ्यावे. २. पॅनमधील सगळे जिन्नस मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्यावे. ३. हे सर्व मिश्रण थोडस भाजून घेतल्यानंतर त्यात किसून घेतलेलं आलं, काजू व शेंगदाणे यांचे बारीक तुकडे घालून ते हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यावे. 

इडली - डोसा - आप्पे, पदार्थ ३ - पीठ १! असे मल्टिपर्पज परफेक्ट पीठ कसे बनवायचे, पाहा कृती...

४. आता या मिश्रणात बारीक रवा घालावा. या मिश्रणात रवा घातल्यानंतरसगळे जिन्नस एकत्रित करुन हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यावे. ५. हे मिश्रण चांगले भाजून झाल्यानंतर सगळयात शेवटी यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यावी. कोथिंबीर घातल्यानंतर सगळे जिनास एकत्रित ढवळून घ्यावेत. 

झटपट उपमा, मेदू वडा, इडली बनविण्यासाठीचे इन्स्टंट प्रिमिक्स तयार आहे. हे प्रिमिक्स वापरुन आपण लगेच उपमा, मेदू वडा, इडली बनवू शकता. आता इडली, मेदू वडा बनविण्यासाठी आपल्याला पीठ आंबविण्याची गरज लागणार नाही. हे तयार झालेले प्रिमिक्स आपण एका हवाबंद डब्यांत भरुन ठेवू शकतो.

टॅग्स :अन्नपाककृती