हिवाळा म्हणजे खवय्यांच्या दृष्टीने मस्त पर्वणी. कारण या दिवसात हिरव्या, लुसलुशीत पालेभाज्या भरपूर प्रमाणात मिळतात. शिवाय इतर भाज्याही या दिवसांत खूपच फ्रेश असतात. हिवाळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या दिवसांत गाजर, मुळा, मटार या भाज्याही भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे मुळा, गाजर, वाटाण्याचे वेगवेगळे पदार्थ घरोघरी अगदी हौशीने केले जातात. यातलाच एक टिपिकल हिवाळी पदार्थ म्हणजे मुळ्याचं लोणचं (mulyacha loncha recipe in Marathi). मुळ्याचं लोणचं अनेकींना व्यवस्थित जमत नाही. मुळ्याचा एक प्रकारचा उग्र वास लोणच्यातही जाणवतो असं त्यांचं म्हणणं असतं (muli ka achar recipe). तुम्हालाही मुळ्याचं लोणचं घातल्यानंतर हाच अनुभव येत असेल तर एकदा या पद्धतीने मुळ्याचं लोणचं करून पाहा...(how to make instant radish pickle)
मुळ्याचं लोणचं करण्याची सोपी रेसिपी
साहित्य
१ मध्यम आकाराचा मुळा
एक ते दिड लिंबाचा रस
बाथरुममध्ये कुबट- दमट वाटतं? 'ही' रोपं बाथरुमच्या कोपऱ्यात ठेवा, कोंदटपणा कमी होऊन फ्रेश वाटेल
१ टेबलस्पून लोणचं मसाला
१ टीस्पून तेल
फोडणीसाठी जिरे, मोहरी, हळद, हिंग
चवीनुसार मीठ आणि लाल तिखट
कृती
सगळ्यात आधी मुळा स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर तो पुसून कोरडा करा आणि मग त्याची सालं काढून टाका.
यानंतर उभा किंवा गोलाकार चकत्या करून तुम्हाला पाहिजे तसा मुळा चिरून घ्या.
गव्हाच्या पिठातही होते आहे भेसळ! तुमच्या घरच्या कणकेत भेसळ तर नाही? करा १ सोपा प्रयोग
आता मुळ्याचे काप एका मोठ्या भांड्यात काढा. त्यामध्ये लिंबू पिळा आणि मीठ घाला. सगळं व्यवस्थित हलवून घ्या, जेणेकरून मीठ आणि लिंबाचा रस मुळ्याच्या सगळ्या फोडींना लागेल. यानंतर हे भांडं साधारण एका तासासाठी झाकून ठेवा. असं केल्याने लिंबाच्या रसात मुळा चांगला मुरला जातो.
यानंतर एका छोट्या कढईमध्ये तेल, मोहरी, जिरे, हिंग टाकून फोडणी करून घ्या. फोडणी झाल्यानंतर गॅस बंद करा आणि त्याच कढईमध्ये बाजारात मिळणारा कोणताही लोणचं मसाला टाका.
Kachua Ring: कासवाची अंगठी घ्यायची? बघा ५०० रुपयांपेक्षाही कमी किमतीत मिळणाऱ्या सुंदर सुबक अंगठ्या
आता ही मसालायुक्त फोडणी लिंबाच्या रसात मुरायला ठेवलेल्या मुळ्याच्या फोडींवर घाला. आवडीनुसार लाल तिखट टाका आणि सगळं पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्या. अशा पद्धतीने केलेलं मुळ्याचं लोणचं एकदा खाऊन पाहा. खूप चटकदार होईल.