Lokmat Sakhi >Food > मुंबई स्पेशल ब्रेड पकोडा खायचाय? अभिनेत्री जुही परमार सांगतेय स्पेशल रेसिपी- झटपट स्ट्रीट फूडची अस्सल चव

मुंबई स्पेशल ब्रेड पकोडा खायचाय? अभिनेत्री जुही परमार सांगतेय स्पेशल रेसिपी- झटपट स्ट्रीट फूडची अस्सल चव

How to Make Bread Pakoda: मुंबईचा स्पेशल ब्रेड पकोडा घरी करायचा असेल तर अभिनेत्री जुही परमार हिने शेअर केलेली ही रेसिपी एकदा बघाच...(Mumbai special bread pakoda recipe by actress Juhi Parmar)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2023 02:26 PM2023-08-24T14:26:39+5:302023-08-24T14:30:24+5:30

How to Make Bread Pakoda: मुंबईचा स्पेशल ब्रेड पकोडा घरी करायचा असेल तर अभिनेत्री जुही परमार हिने शेअर केलेली ही रेसिपी एकदा बघाच...(Mumbai special bread pakoda recipe by actress Juhi Parmar)

Mumbai special bread pakoda recipe by actress Juhi Parmar, How to make bread pakoda? | मुंबई स्पेशल ब्रेड पकोडा खायचाय? अभिनेत्री जुही परमार सांगतेय स्पेशल रेसिपी- झटपट स्ट्रीट फूडची अस्सल चव

मुंबई स्पेशल ब्रेड पकोडा खायचाय? अभिनेत्री जुही परमार सांगतेय स्पेशल रेसिपी- झटपट स्ट्रीट फूडची अस्सल चव

Highlightsबाहेर रिमझिम पाऊस पडत असताना चहासोबत हा ब्रेड पकोडा खाण्यातली मजा काही वेगळीच आहे...

वडापाव हा जसा मुंबईचा एक प्रसिद्ध पदार्थ आहे, तसेच तिथल्या स्ट्रीटफूडमध्ये (street food) घेतलं जाणारं आणखी एक लोकप्रिय नाव म्हणजे ब्रेड पकोडा (Mumbai special bread pakoda). ब्रेड पकोडा करण्याच्या अनेक रेसिपी आहेत. पण अभिनेत्री जुही परमार हिने नुकतीच मुंबई स्पेशल ब्रेड पकोडा रेसिपी ( recipe by actress Juhi Parmar) तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

 

आता तुम्ही जिथे राहात असाल तिथे तुमच्या घरी बसून जर तुम्हाला मुंबईची ही स्पेशल डिश चाखून पाहायची असेल, तर तिची ही रेसिपी बघा (How to make bread pakoda?) आणि खमंग- चटकदार ब्रेड पकोडा लगेचच तयार करा. बाहेर रिमझिम पाऊस पडत असताना चहासोबत हा ब्रेड पकोडा खाण्यातली मजा काही वेगळीच आहे...

 

ब्रेड पकोडा रेसिपी
साहित्य

१ कप बेसन पीठ

१ टेबलस्पून तांदळाचे पीठ

चवीनुसार तिखट आणि मीठ

सोन्याचांदीचे दागिने लख्ख चमकतील, स्वयंपाक घरातली फक्त १ गोष्ट वापरा, दागिने होतील चकाचक

१ टीस्पून ओवा

हिरव्या चटणीसाठी पुदिना, कोथिंबीर लसूण, आलं आणि लिंबू

टोमॅटो सॉस

पकोडे तळण्यासाठी तेल 

 

रेसिपी
१. ब्रेड पकोडे करण्यासाठी सगळ्यात आधी पुदिना, कोथिंबीर सम प्रमाणात घ्या. त्यात ५ ते ६ लसूण पाकळ्या, थोडंसं आलं टाका आणि हे सगळं मिश्रण मिक्सरमधून फिरवून त्याची चटणी करून घ्या. त्यात आता थोडं लिंबू आणि चवीनुसार मीठ घाला.

हृदय ठणठणीत आणि पाठीचा कणा राहील ताठ, करा मलायका अरोरा सांगतेय ते गोमुखासन रोज

२. पकोड्यांसाठी पीठ भिजवताना बेसन, तांदळाचे पीठ, ओवा आणि चवीनुसार तिखट, मीठ असं एका भांड्यात घ्या आणि थोडं थोडं पाणी टाकून पीठ सैलसर भिजवून घ्या.

३. आता ब्रेडच्या एका स्लाईसला हिरवी चटणी लावा आणि दुसऱ्या स्लाईसला टोमॅटो सॉस लावा.

४. हे ब्रेड एकावर एक ठेवा आणि पीठामध्ये घोळून कढईमध्ये तळण्यासाठी अलगद सोडून द्या. तापलेल्या तेलात मध्यम आचेवर वडे तळून घ्या.

Web Title: Mumbai special bread pakoda recipe by actress Juhi Parmar, How to make bread pakoda?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.