कुरमुऱ्यांचा वापर करून आपण भेळ, चिवडा, भडंग असे मस्त चटपटीत पदार्थ करतो. छोट्या भुकेसाठी किंवा टी - टाईमसाठी आपण कुरमुऱ्यांचे अनेक पदार्थ खातो. पण याच कुरमुऱ्यांचा (Murmura Dosa Recipe) वापर करून आपण अनेक पदार्थ देखील तयार करु शकतो. वाटीभर कुरमुरे वापरून आपण (Puffed Rice Dosa) चक्क कुरकुरीत डोसा (How To Make Super Soft Murmura Dosa At Home) इन्स्टंट डोसा तयार करू शकतो, असं कुणाला सांगितलं तर विश्वास बसणार नाही. पण होय! या कुरमुऱ्यांपासून आपण घाई गडबडीच्या वेळी सकाळी नाश्त्याला इन्स्टंट डोसा तयार करू शकतो.
बरेचदा अनेक घरांमध्ये सकाळच्या नाश्त्याला डोसा केला जातो. परंतु डोसा तयार करायचा म्हटलं तर डाळ - तांदूळ भिजवण्यापासून ते वाटून बॅटर तयार करण्यापर्यंत खूप मेहनत घ्यावी लागते. शिवाय डाळ -तांदूळ भिजत न घालता हे पदार्थ तयार होत नाही. जर आपल्याला इन्स्टंट डोसे खायचे असतील तर, डाळ - तांदूळ भिजत न घालता कुरमुऱ्यांचा इन्स्टंट डोसा तयार करून पाहा.
साहित्य :-
१. कुरमुरे - २ कप
२. दही - २ कप
३. मीठ - चवीनुसार
४. साखर - १ टेबलस्पून
५. बेसन - २ टेबलस्पून
६. बारीक रवा - २ टेबलस्पून (पाण्यांत भिजवलेला रवा)
७. बेकिंग सोडा - चिमूटभर
८. पाणी - गरजेनुसार
९. मैदा - २ टेबलस्पून
चटणी है क्या? ६ चटण्यांचे पाहा सुपरहिट प्रकार, जेवणाला येईल रंगत-तोंडी लावा चटणी चटपटीत...
दही मस्त घट्ट लावण्याची ‘ही’ ट्रिक पाहा, फक्त १५ मिनिटांत दही विरजण्याची युक्ती...
कृती :-
१. सगळ्यात आधी एक बाऊल घेऊन त्यात बारीक रवा आणि पाणी एकत्रित करून रावा पाण्यांत व्यवस्थित भिजवून घ्यावा. १० ते १५ मिनिटे रवा पाण्यांत भिजवून घ्यावा.
२. आता एका दुसऱ्या बाऊलमध्ये कुरमुरे घेऊन त्यात दही ओतून घ्यावे. या दह्यात कुरमुरे १० मिनिटांसाठी भिजवून थोडे मऊ करून घ्यावेत.
३. एक मिक्सरच मोठं भांड घेऊन त्या भांडयात दह्यात भिजवून घेतलेले कुरमुरे ओतून ते मिक्सरमध्ये फिरवून घ्यावेत.
४. एकदा हे मिश्रण मिक्सरमधून फिरवून घेतल्यावर त्यात चवीनुसार मीठ, साखर, बेसन, मैदा आणि पाण्यांत भिजवून घेतलेला रवा घालावा.
५. आता हे सगळे मिश्रण एकत्रित मिक्सरमधून फिरवून घ्यावे. सगळ्यात शेवटी या मिश्रणात पाणी घालूंन पुन्हा एकदा बॅटर मिक्सरमधून फिरवून घ्यावे.
६. मिक्सरमधील तयार मिश्रण एका बाऊलमध्ये काढून त्यात चिमूटभर बेकिंग सोडा आणि किंचित पाणी घालूंन बॅटर व्यवस्थित ढवळून घ्यावे.
७. तव्याला तेल लावून तव्यावर हे बॅटर सोडून, डोसा दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यावा.
मस्त कुरकुरीत, खरपूस भाजलेला कुरमुऱ्यांचा डोसा खाण्यासाठी तयार आहे. हा तयार डोसा आपण चटणी किंवा सांबार सोबत खाण्यासाठी सर्व्ह करु शकता.