मुलांना मधल्या वेळेत प्रचंड भूक लागते (Murmura Laddu). फक्त मुलांनाच नाही तर, मोठ्यांनाही भूक लागते. अशावेळी आपण उलट सुलट पदार्थ खातो. ज्यामुळे तब्येत बिघडते आणि वजनही वाढते (Cooking Tips). वजन वाढलं की साहजिक इतर गंभीर आजारांचाही धोकाही वाढतो (Food).
जर आपल्यालाही मधल्या वेळेत भूक लागते, पण काय खावं सुचत नसेल तर, घरातच कुरमुऱ्याचे लाडू करून ठेवा. भूक लागल्यावर रोज एक कुरमुऱ्याचे लाडू आपण खाऊ शकता. कुरमुऱ्याचा चिवडा, भडंग आपण खाल्लंच असेल. पण कधी लाडू करून पाहिलं नसेल तर, एकदा ही ट्राय करून पाहाच. हे लाडू फसणार नाहीत. परफेक्ट जमतील(Murmura Ladoo| Puffed Rice Laddu).
कुरमुऱ्याचे लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य
कुरमुरे
गुळ
फक्त ५ स्टेप्स आणि घरातच तयार होईल सुपर सॉफ्ट इडली; दाक्षिणात्य पद्धतीची इडली हवी असेल तर..
पाणी
तूप
अशा पद्धतीने करा कुरमुऱ्याचे लाडू
सर्वात आधी पॅनमध्ये दीड चमचे तूप घाला. तूप गरम झाल्यानंतर त्यात दीड कप किसलेला गुळ घाला. गुळात दीड वाटी पाणी घालून मिक्स करा, आणि गुळाचा पाक तयार करा.
ना साखर- ना गॅस, कपभर सुक्या खोबऱ्याचे करा झटपट पौष्टीक लाडू; हाडांची दुखणी होतील दूर
गुळाचा पाक तयार झाल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवा. नंतर त्यात ५ कप कुरमुरे घालून मिक्स करा. आपण त्यात आपल्या आवडीचे बारीक चिरलेले ड्रायफ्रुट्सही घालू शकता.
सगळं साहित्य मिक्स केल्यानंतर गॅस बंद करा. हाताला तूप लावा, आणि लाडू वळवून घ्या. अशा प्रकारे कुरमुऱ्याचे लाडू रेडी. हवाबंद डब्यात साठवून ठेवल्यास कुरमुऱ्याचे लाडू महिनाभर टिकतात.