Lokmat Sakhi >Food > मुरमुऱ्याचा वडा कधी खाल्ला आहे ? १ वाटी मुरमुऱ्याचे करा झटपट वडे, शाळेच्या डब्यासाठी बेस्ट पदार्थ...

मुरमुऱ्याचा वडा कधी खाल्ला आहे ? १ वाटी मुरमुऱ्याचे करा झटपट वडे, शाळेच्या डब्यासाठी बेस्ट पदार्थ...

Murmura Vada Recipe : Easy & Quick Murmura Recipes : मुरमुऱ्यांचा वापर करुन झटपट होणारा मुरमुरा वडा बनवू शकतो, त्याचीच ही सोपी रेसिपी पाहूयात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2024 06:40 PM2024-06-18T18:40:58+5:302024-06-18T18:56:35+5:30

Murmura Vada Recipe : Easy & Quick Murmura Recipes : मुरमुऱ्यांचा वापर करुन झटपट होणारा मुरमुरा वडा बनवू शकतो, त्याचीच ही सोपी रेसिपी पाहूयात.

Murmura Vada Recipe Easy & Quick Murmura Recipes How To Make Murmura Vada At Home | मुरमुऱ्याचा वडा कधी खाल्ला आहे ? १ वाटी मुरमुऱ्याचे करा झटपट वडे, शाळेच्या डब्यासाठी बेस्ट पदार्थ...

मुरमुऱ्याचा वडा कधी खाल्ला आहे ? १ वाटी मुरमुऱ्याचे करा झटपट वडे, शाळेच्या डब्यासाठी बेस्ट पदार्थ...

मुरमुरे हा एक हलका - फुलका, कुरकुरीत स्नॅक्सचा प्रकार आहे, जो सगळ्यांना खायला आवडतो. टी टाईम स्नॅक्ससाठी मुरमुऱ्यांपासून तयार केलेले अनेक पदार्थ खाल्ले जातात. मुरमुऱ्यांचे लाडू, चिवडा, भेळ, भडंग हे पदार्थ भरपूर प्रमाणात खाल्ले जातात. टी टाईम स्नॅक्स किंवा मधल्या वेळेत भूक लागली असेल तर अशावेळी आपण मुरमुऱ्यांचे हलके - फुलके स्नॅक्स (murmura snacks recipe) खाऊ शकतो. मुरमुरे हे त्यांच्या खास चवीसाठी फेमस असले तरी त्यांचे आरोग्यदायी फायदे अधिक आहेत. त्यामुळे मुरमुरे हे फक्त स्नॅक्स (South special murmura vada) म्हणून न खाता पौष्टिक पदार्थ समजून आवर्जून खाल्ला पाहिजे(murmura vada with chutney) 

मुरमुऱ्यांमध्ये भरपूर प्रमाणात कर्बोदक, प्रथिन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह असते. या मुरमुऱ्यांमध्ये आरोग्यास अपायकारक वाईट फॅट्स व कोलेस्ट्रॉल नसते. त्यामुळे मुरमुऱ्यांपासून बनवलेले पदार्थ खाणे शरीराला फायदेशीर ठरते. या मुरमुऱ्यांचा वापर करुन झटपट होणारा साऊथ इंडियन स्टाईल मुरमुरा वडा बनवू शकतो. साऊथ इंडियन स्टाईल मुरमुरा वडा बनवण्याची सोपी रेसिपी पाहूयात(How To Make Murmura Vada At Home).   

साहित्य :- 

१. मुरमुरे - २ कप 
२. पाणी - गरजेनुसार 
३. हिरवी मिरची - २ ते ३ (बारीक चिरलेल्या)
४. कढीपत्ता - ६ ते ८ पान (बारीक चिरलेला)
५. आल्याची पेस्ट - १ टेबलस्पून 
६. कोथिंबीर - १ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
७. जिरे - १ टेबलस्पून 
८. काळीमिरी पूड - १/२ टेबलस्पून 
९. मीठ - चवीनुसार 
१०. तांदुळाचे पीठ - २ टेबलस्पून 
११. दही - २ टेबलस्पून 
१२. तेल - तळण्यासाठी 

फणस कापण्याचा व्याप मोठा, हात - सुरी चिकट होते? ३ सोप्या टिप्स - फणस खा - कापा- बरंका...

साऊथ इंडियन पारंपरिक मुरुक्कु करण्याची सोपी रेसिपी, पावसाळ्यात चहासोबत मुरुक्कू खा, अनुभवा मौसम का जादू...

कृती :-

१. एका मोठ्या बाऊलमध्ये मुरमुरे घेऊन त्यात गरजेनुसार पाणी घालून ते हलकेच भिजवून घ्यावेत. 
२. भिजवलेले मुरमुरे एका वेगळ्या भांड्यात काढून घ्यावेत, आता हे मुरमुरे हातांनी दाबून हलकेच मॅश करुन घ्यावेत.  
३. आता त्यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घालावा. 
४. त्यानंतर त्यात आल्याची पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरे, काळीमिरी पूड, चवीनुसार मीठ, तांदुळाचे पीठ, दही घालावे. 

दुधावर ठेवण्याची जाळी स्वच्छ - चकचकीत करण्याचा सोपा उपाय, काळी झालेली जाळी दिसेल नव्यासारखी... 

५. आता हे सगळे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून मळून घ्यावे. 
६. मिश्रण थोडे घट्टसर मळून झाल्यावर त्याचे मेंदू वड्याच्या आकारासारखे वडे करुन घ्यावेत. 
७. आता हे वडे तेलात खरपूस तळून घ्यावेत. 

साऊथ इंडियन स्टाईल मुरमुरा वडा खाण्यासाठी तयार आहे. गरमागरम मुरमुरा वडा चटणी किंवा सांबरसोबत खाण्यासाठी सर्व्ह करु शकता.

Web Title: Murmura Vada Recipe Easy & Quick Murmura Recipes How To Make Murmura Vada At Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.