Lokmat Sakhi >Food > मेदू वडा उरला ? मग करा चमचमीत चवीचा 'मेदू वडा बर्गर', करायला सोपा खायला चटपटीत असा पदार्थ...

मेदू वडा उरला ? मग करा चमचमीत चवीचा 'मेदू वडा बर्गर', करायला सोपा खायला चटपटीत असा पदार्थ...

Mysore Medu Vada burger Recipe : Leftover Medu Vada Recipe : Leftover medu vada burger recipe indian style : उरलेल्या मेदू वड्याचा बर्गर तयार करण्याची झटपट रेसिपी ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2025 08:13 IST2025-02-07T07:51:38+5:302025-02-07T08:13:28+5:30

Mysore Medu Vada burger Recipe : Leftover Medu Vada Recipe : Leftover medu vada burger recipe indian style : उरलेल्या मेदू वड्याचा बर्गर तयार करण्याची झटपट रेसिपी ...

Mysore Medu Vada burger Recipe Leftover Medu Vada Recipe Leftover medu vada burger recipe indian style | मेदू वडा उरला ? मग करा चमचमीत चवीचा 'मेदू वडा बर्गर', करायला सोपा खायला चटपटीत असा पदार्थ...

मेदू वडा उरला ? मग करा चमचमीत चवीचा 'मेदू वडा बर्गर', करायला सोपा खायला चटपटीत असा पदार्थ...

बहुतेकवेळा आपल्याकडे सकाळच्या नाश्त्यात मेदू वडे फारच आवडीने खाल्ले जातात. मेदू वडा, डोसा, इडली असे दाक्षिणात्य पदार्थ आता सर्रास सगळ्यांच्याच  घरी कधी ना कधी तयार केले ( Leftover Medu Vada Recipe) जातात. यातही कुरकुरीत, खमंग, क्रिस्पी असा मेदू वडा घरातील सगळ्यांनाच खायला आवडतो. मेदू वडे (Leftover medu vada burger recipe indian style) एकदा तयार केले की शक्यतो ते खाऊन फस्तच होता. फार क्वचितच अशी वेळ येते की मेदू वडे उरले आहेत. या उरलेल्या मेदू वड्याच  नेमकं करायचं काय असा प्रश्न पडतो. कारण असा थंड झालेला मेदू वडा कुणालाही खायला आवडत नाही. अशावेळी आपण या मेदू वड्याचा झटपट होणारा खास बर्गर तयार करु शकतो(Mysore Medu Vada burger Recipe).

उरलेल्या मेदू वड्याला थोडासा हटके मॉर्डन ट्विस्ट देत आपण चक्क त्याचा हेल्दी बर्गर तयार करु शकतो. हा चटपटीत मेदू वडा बर्गर तयार करण्यासाठी आपल्याला फारसे साहित्य लागणार नाही, घरात उपलब्ध असणाऱ्या पदार्थांचा वापर करुन आपण मस्त चमचमीत चवीचा बर्गर घरीच तयार करु शकतो. यासाठी उरलेल्या मेदू वड्याचा बर्गर तयार करण्याची झटपट रेसिपी पाहूयात.

साहित्य :- 

१. उरलेले मेदू वडे - ३ ते ४
२. बटर - २ ते ३ टेबलस्पून 
३. कांदा - १ कप (बारीक चिरलेला)
४. हिरवी भोपळी मिरची - १ कप (बारीक चिरलेली)
५. टोमॅटो - १ कप (बारीक चिरलेला)
६. मीठ - चवीनुसार 
७. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून 
८. शेजवान सॉस - १ टेबलस्पून 
९. पनीर - १ कप (चौकोनी मध्यम आकाराचे तुकडे)
१०. चीज - गरजेनुसार 
११. चिली फ्लेक्स - १/२ टेबलस्पून
१२. ऑरेगॅनो - १/२ टेबलस्पून

फक्त २ तासांत लावा विकतसारखे दही, विरजण लावताना मिसळा ‘हा’ सिक्रेट पदार्थ...


मूठभर मेथी-कपभर ताक, करा ‘मेथी कढी’, चव अशी की मारावा मस्त भुरका...

कृती :- 

१. सर्वात आधी एक पॅन घेऊन त्यात थोडे बटर घालून मग त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी भोपळी मिरची, टोमॅटो घालावा. 
२. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, लाल तिखट मसाला, शेजवान सॉस, पनीरचे मध्यम आकाराचे तुकडे घालून सगळ्या भाज्या हलक्याच परतवून घ्याव्यात.   
३. आता उरलेले मेदू वडे घेऊन बरोबर मधोमध गोलाकार कापून त्याचे दोन भाग करून घ्यावेत. 
४. पॅनवर थोडे बटर घालून हे दोन्ही भाग बटरमध्ये हल्केच परतून घ्यावेत. 

दीपिका पादुकोणला आवडतो तसा ‘रस्सम राइस’ करायचाय? ही घ्या स्पेशल साऊथ इंडियन रेसिपी...

५. आता मेदू वड्याचा एक भाग घेऊन त्यावर तयार केलेली भाजी पसरवून घालावी. त्यानंतर त्यावर आपल्या आवडीनुसार चीज किसून घालावे. 
६. मग त्यावर चिली फ्लेक्स व ऑरेगॅनो भुरभुरवून घालावेत. त्यानंतर मेदु वड्याचा दुसरा कापून घेतलेला भाग त्यावर ठेवावा. पॅनमध्ये ठेवून २ ते ३ मिनिटे गरम करून घ्यावे. 
७. सगळ्यात शेवटी या तयार बर्गरवर चीज किसून घालावे. 

आपला मेदू वडा बर्गर खाण्यासाठी तयार आहे. अशाप्रकारे आपण उरलेल्या मेदू वड्याचा चटपटीत बर्गर तयार करुन खाऊ शकतो.

Web Title: Mysore Medu Vada burger Recipe Leftover Medu Vada Recipe Leftover medu vada burger recipe indian style

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.