उत्तम आरोग्यासाठी पौष्टिक आहार घेणं गरजेचं आहे. रोजच्या आहारात आपण भात, पोळी, भाजी, सॅलड, डाळींचा समावेश करतो. ज्यात नाचणीच्या भाकरीचा देखील समावेश आहे. नाचणीत प्रथिने, कार्बोदके, कॅल्शियम आणि फॉस्फरस मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे शरीरातील चरबी कमी होण्याबरोबरच हाडांनाही मजबूती मिळते.
डायबिटीजग्रस्त रुग्णांना नाचणीची भाकरी खाण्यास सल्ला देतात. ते देखील हा पदार्थ आवडीने खाऊ शकतात. नाचणीचे घावणे किंवा नाचणीचे धिरडे असे या पदार्थाला म्हटले जाते. हा पदार्थ कोकणात फार फेमस आहे. चला तर मग पौष्टिकतेने परिपूर्ण असा हा पदार्थ कसा करायचा पाहुयात(Nachani ghavane/ ghavan | Ragi neer dosa).
नाचणीचे घावणे करण्यासाठी लागणारं साहित्य
नाचणीचे पीठ
तांदळाचं पीठ
बारीक रवा
पाणी
पीठ -मीठ -पाणी आणि ५ मिनिटात करा जाळीदार घावन, मऊ लुसलुशीत घावनांची मजाच न्यारी..
तेल
कृती
सर्वप्रथम, एका बाऊलमधे एक कप नाचणीचे पीठ घ्या, त्यात तांदळाचं पीठ, बारीक रवा, व एक ग्लास पाणी घालून चमच्याने मिश्रण मिक्स करा.
मिश्रण मिक्स झाल्यानंतर त्यात आणखी एक ग्लास पाणी घालून मिश्रण चांगले मिक्स करा. मिश्रण जास्त घट्ट किंवा पातळ करायचे नाही. ज्याप्रमाणे आपण घावणे करताना बॅटर रेडी करतो, त्याचप्रमाणे बॅटर रेडी करायचं आहे. आता त्यावर १० मिनिटांसाठी झाकण ठेऊन बाजूला ठेवा.
१० मिनिटे झाल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालून मिश्रण चांगले मिक्स करा. आपल्याला हवं असल्यास आपण त्यात कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालून मिक्स करू शकता.
एक कप साबुदाणा - एक किलो बटाट्याचे बनवा लच्छा पापड, क्रिस्पी पापड - टिकतील वर्षभर
दुसरीकडे तवा गरम करण्यासाठी ठेवा, तव्याला तेलाने ग्रीस करा. तवा गरम झाल्यानंतर त्यावर बॅटर चमच्याने पसरवा. व दोन्ही बाजूने शेकून घ्या. अशा प्रकारे नाचणीचे पौष्टिक जाळीदार घावणे खाण्यासाठी रेडी. आपण ही रेसिपी नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकता.