Join us  

नागपंचमी: पुरणाचे दिंड कधी मऊ पडतात तर कधी वातड होतात? घ्या रेसिपी- दिंड होतील फर्स्टक्लास... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2024 1:59 PM

Nag Panchami 2024 Special: नागपंचमीला पुरणाचे दिंड आवर्जून केले जातात. पण ते बऱ्याचदा व्यवस्थित जमतच नाहीत.. म्हणूनच ही बघा एकदम सोपी आणि परफेक्ट रेसिपी... (puranache dind karnyachi recipe in marathi)

ठळक मुद्देआता ही एक सोपी रेसिपी पाहून घ्या आणि या पद्धतीने दिंड करून बघा. दिंड करण्याचा बेत अगदी उत्तम जमून येईल.

आपल्याकडे प्रत्येक सणाला काहीतरी वेगळा गोड पदार्थ केला जातो. आणि त्या दिवशी त्या पदार्थाला खूप मान असतो. असाच एक पदार्थ म्हणजे पुरणाचे दिंड. एरवी आपण सणासुदीला पुरणपोळी करतो. पण नागपंचमीच्या दिवशी मात्र पुरणाचे दिंडच असतात (Nag Panchami 2024 Special). आता ते बऱ्याच जणींना व्यवस्थित जमत नाहीत. कधी कधी ते खूपच मऊ पडतात (how to make puranache dind?). तर कधी खूप वातड, चिवट होतात. काहीजणींच्या दिंडामध्ये तर व्यवस्थित सगळ्याबाजुने पुरण भरलेही जात नाही. म्हणूनच आता ही एक सोपी रेसिपी पाहून घ्या आणि या पद्धतीने दिंड करून बघा (traditional maharashtrian recipe). दिंड करण्याचा बेत अगदी उत्तम जमून येईल.(puranache dind karnyachi recipe in marathi)

 

पुरणाचे दिंड करण्याची रेसिपी 

साहित्य

१ वाटी हरबरा डाळ

१ वाटी गूळ

२०० किलो सोन्याचे दागिने, आजुबाजुला ५० बॉडीगार्ड! बघा 'जोधा अकबर'च्या सेटवर कसा होता ऐश्वर्याचा थाट

२ टेबलस्पून खोवलेलं नारळ

चिमूटभर केशर

१ टीस्पून वेलची पावडर आणि जायफळ पावडर

पाव वाटी तूप

दिड वाटी कणिक

 

कृती

- हरबरा डाळ चांगली धुवून घ्या आणि दोन ते अडीच वाट्या पाणी टाकून कुकरमध्ये शिजायला लावा.

- मध्यम आचेवर डाळ मऊसूत शिजली की डाळ एखाद्या चाळणीत घेऊन तिच्यातले जास्तीचे पाणी काढून घ्या. 

नागपंचमी विशेष: हातावर मेहेंदी काढायची पण वेळच नाही? बघा ५ मिनिटांत काढता येणाऱ्या सुंदर डिझाईन्स

- आता एका कढईमध्ये डाळ आणि गूळ टाका आणि पुरणाला चटका देऊन घ्या. त्याचवेळी त्यात नारळ, केशर, जायफळ, वेलची पावडर घाला. 

- पुरणाला चटका लागेपर्यंत मऊसूत कणिक भिजवून घ्या. कणिक भिजवताना त्यात तूप गरम करून टाका. यामुळे दिंड छान मऊ होतात.

-  साधारण पुरीसाठी घेतो तेवढ्या आकाराचा कणकेचा गोळा घ्या आणि तो थोडा लाटून मोठा करा. आता त्यात पुरणाचा गोळा टाका आणि आजुबाजुची पोळी व्यवस्थित दुमडून घ्या.

- इडली पात्राला तूप लावा आणि त्यावर आपण केलेले दिंड ठेवा. साधारण १२ ते १५ मिनिटे मध्यम आचेवर वाफवून घ्या. दिंड हाताला थोडे कडक झाल्यासारखे वाटले की गॅस बंद करा. या दिंडावर तूप टाकून त्याचा गरमागरम आस्वाद घ्या..  

 

टॅग्स :नागपंचमीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.अन्नपाककृती